शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक, दूध दराबाबत निदर्शने, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 19:42 IST

गाय व म्हैशीच्या दूध दरातील वाढ अचानक रद्द झाल्याच्या प्रश्नावर बुधवारी शेतकरी संघटनेने दुग्धविकासमंत्री व कृषी मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून निदर्शने केली. यावेळी विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. ​​​​​​​

ठळक मुद्देमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून निदर्शने गाय व म्हैशीच्या दूध दरातील वाढ अचानक रद्द केल्यामुळे उत्पादकांचा तोटादुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे पाठपुरावा

सांगली : गाय व म्हैशीच्या दूध दरातील वाढ अचानक रद्द झाल्याच्या प्रश्नावर बुधवारी शेतकरी संघटनेने दुग्धविकासमंत्री व कृषी मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून निदर्शने केली. यावेळी विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.गाय व म्हैशीच्या दूध दरात वाढ करण्याचे आदेश शासनाने दूध संस्थांना देऊनही, पुन्हा दरात कपात करण्यात आली आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना दुधाची बाटली भेट दिली होती.

बुधवारी अचानक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी दुग्धविकासमंत्री व कृषी मंत्र्यांचे प्रतीकात्मक पुतळे आणले होते. त्यावर दुधाचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी पोलिसांनी त्यांची धरपकड केली. पोलिसांनी मुख्य कार्यकर्त्यांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई केली.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने गाईच्या दुधाला प्रतीलिटर २ रुपये आणि म्हैशीच्या दुधाला ३ रुपये दरवाढ देण्याचे आदेश दूध संस्थांना दिले होते. त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना कशी तरी महिनाभर दरवाढ देण्यात आली. त्यानंतर अचानक सहकारी व खासगी दूध संघ व संस्थांनी गाईच्या व म्हैशीच्या दुधाचे दर २ ते ३ रुपयांनी कमी केले.

याबाबत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. दर कमी करणारे संघ व संस्थांवर कारवाई करण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतर राज्यातील दूध संघ व संस्थांच्या दबावाला बळी पडून या कारवाईला त्यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे नुकसान होत आहे.आंदोलनात संजय कोले, सुनील फराटे, रावसाहेब दळवी, शीतल राजोबा, रामचंद्र कणसे, मोहन परमणे, अल्लाउद्दीन जमादार, वसंत भिसे, एकनाथ कापसे, अण्णा पाटील, सदाशिव पाटील, अण्णासाहेब हरताळे, शीतल पाटील सहभागी होते.

दर कमी केल्यामुळे उत्पादकांचा तोटा वाढत आहे. दूध खरेदी दर कमी करताना याच संस्थांनी ग्राहकांना विक्री दरात कोणतीही कपात केली नाही. दूध उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत दूध पोहोचेपर्यंत मध्यस्थांचे कमिशन मिळून एकूण ८ ते १० रुपये खर्च होतो.

दूध खरेदी दर व सर्व खर्च मिळून एकूण २८ ते ३0 रुपये होतात. मात्र ग्राहकांना तेच दूध ४० ते ४५ रुपयांना विकले जाते. शेतकºयांचा तोटा सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.

टॅग्स :GovernmentसरकारSangliसांगली