शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेतर्फे सांगलीत दूध वाटप आंदोलन : दूध उत्पादकांची लूट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:52 IST

सांगली : दुधाला सरकारने प्रति लिटर २७ रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले. ‘लुटता कशाला, फुकटच प्या’ या आशयाच्या घोेषणा यावेळी

ठळक मुद्देसरकारने प्रतिलिटर २७ रूपये दर देण्याची मागणी

सांगली : दुधाला सरकारने प्रति लिटर २७ रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले. ‘लुटता कशाला, फुकटच प्या’ या आशयाच्या घोेषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व जिल्ह्यातही काही ठिकाणी हे आंदोलन करण्यात आल.शेतकऱ्यांना लुटण्यापेक्षा फुकटच दूध घ्या, यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ३ मे ते ९ मेअखेर हे आंदोलन होणार असून ठिकठिकाणी दूध वाटप केले जाणार आहे. याची सुरूवात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाने झाली.आंतरराष्टÑीय दूध पावडरचे दर कोसळल्याचे सांगत, राज्यात दुधाचा महापूर असल्याचे सांगण्यात येत आहे. एक टॅँकर दुधाचे तीन टॅँकर दूध तयार केले जात आहे. चांगल्या दर्जाच्या दुधाला १७ रूपये दर देऊन तेच दूध ५० रूपये लिटरने ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. त्यामुळे शेतकºयांची लूट सरकारकडून सुरू असून ती थांबविण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती आंदोलकांनी दिली.यावेळी उमेश देशमुख, सुदर्शन घेरडे, जयकुमार सकळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोकोसांंगली : सरकारच्यावतीने कर्जमाफीची घोषणा करताना गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रूपये दर देण्याची घोषणा केली होती. त्यावर अभ्यासासाठी समिती नेमण्यात आली. मात्र, अजूनही त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने दुधाची दरवाढ करावी, या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील शिवशंभो चौकात झालेल्या या आंदोलनात मौजे डिग्रज येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदनात म्हटले आहे की, सरकारने दुधाची दरवाढ करून शेतकºयांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अभ्यास समिती नेमूनही त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत स्वत:ला शेतकºयांचे तारणहार समजतात. मात्र, ते मंत्री झाल्यापासून त्यांनीही दूध उत्पादकांना दिलासा दिलेला नाही. सध्या गोळी पेंड, चारा, मिनरल मिक्श्चर, मजुरी यासह इतर खर्च वाढत चालल्याने दूध उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे तातडीने दूध दरवाढ करावी, अन्यथा पुढील काळात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे वाहन अडविण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस सुनील फराटे, समीर पाटील, विजय लांडे, अश्विनकुमार बिरनाळे, सनी आवटी, सुहास गाढवे, महावीर चौगुले, वसंत भिसे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Sangliसांगलीmilkदूध