शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘बंटी-बबली’चा सराफाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:01 IST

सांगली : सोन्याची चेन देऊन त्याबदल्यात नेकलेस खरेदी करायचा आहे असे सांगून, ‘बंटी-बबली’ने सराफ कट्ट्यावरील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक अनिल वामन गडकरी यांना खोटी चेन देऊन हातोहात ५१ हजारांचा गंडा घातला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. हे ‘बंटी-बबली’ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.शनिवारी आठवडा बाजार होता. शहर पोलीस ठाण्यापासून कापड ...

सांगली : सोन्याची चेन देऊन त्याबदल्यात नेकलेस खरेदी करायचा आहे असे सांगून, ‘बंटी-बबली’ने सराफ कट्ट्यावरील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक अनिल वामन गडकरी यांना खोटी चेन देऊन हातोहात ५१ हजारांचा गंडा घातला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. हे ‘बंटी-बबली’ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.शनिवारी आठवडा बाजार होता. शहर पोलीस ठाण्यापासून कापड पेठ, बालाजी चौक, सराफ कट्टा ते टिळक चौकापर्यंत बाजार भरतो. त्यामुळे प्रचंड गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत दुपारी एक वाजता गडकरी यांच्या दुकानात हे बंटी-बबली घुसले. दुकानातही गर्दी होती. काऊंटरला त्यांनी, चेन मोडून त्याबदल्यात नेकलेस करायचा असल्याचे सांगितले. गर्दीमुळे कामगारांनी चेनची तपासणी केली नाही. दीड तोळ्याची ही चेन होती. तेवढ्याच वजनाचा नेकलेस त्यांनी खरेदी केला. खरेदीची पावती करताना त्यांनी साक्षी शिंदे व विजय शिंदे (रा. बुधगाव, ता. मिरज) अशी नावे सांगितली. नेकलेस घेऊन हे दाम्पत्य दुकानातून निघून गेले. रात्री साडेआठ वाजता गडकरी व कामगार दिवसभरात झालेल्या व्यवसायाची मोजदाद करीत होते. त्यावेळी त्यांनी या ‘बंटी-बबली’ने दिलेल्या चेनची तपासणी केली, तेव्हा ही चेन बनावट असल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला.रविवारी सकाळीही गडकरी यांनी चेनची तपासणी केली. मात्र ती बनावट असल्याचेच स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गडकरी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दुकानात भेट देऊन ‘सीसीटीव्ही’ फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याआधारे तपास सुरु ठेवला आहे.गडकरी यांनीही राज्यात आणखी कुठे सराफ व्यावसायिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी या ‘बंटी-बबली’चे फुटेज सराफ असोसिएशनला पाठविले आहे. असोसिएशननेही सर्व सराफ व्यावसायिकांना फुटेजमध्ये कैद झालेल्या ‘बंटी-बबली’चे छायाचित्र व्हॉटस् अ‍ॅपवर पाठविले आहे.कºहाडमध्येही प्रयत्नगडकरी यांना गंडा घातलेल्या ‘बंटी-बबली’ने कºहाडमध्येही दोन दुकानात बनावट चेन देऊन गंडा घालण्याचा प्रयत्न केला होता. तेथील दुकानातही सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते कैद झाले आहेत. बंटी ४५, तर बबली ४० वयोगटातील आहे. बंटी शरीराने धिप्पाड आहे. त्याला व्यवस्थित चालताही येत नाही. दोघेही पती-पत्नी असावेत, असा संशय आहे.