शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या राष्टÑवादीतील वाद वरिष्ठ नेत्यांपर्यंत- संघर्ष टोकाला : दोन्ही गट आरोपांवर ठाम,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:50 IST

सांगली : महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच सांगली महापालिका क्षेत्रात राष्टÑवादीअंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. एकमेकांवर कुरघोड्या करीत दोन्ही गट आक्रमक होऊ पाहात आहेत. याबाबतची कल्पना काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांनाही दिली आहे.सांगली जिल्हा राष्टÑवादीला गेल्या चार वर्षांपासून वादाचे ग्रहण लागले आहे. लोकसभा, विधानसभा ...

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीपूर्वीच पक्षीय नेत्यांची डोकेदुखी वाढली

सांगली : महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच सांगली महापालिका क्षेत्रात राष्टÑवादीअंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. एकमेकांवर कुरघोड्या करीत दोन्ही गट आक्रमक होऊ पाहात आहेत. याबाबतची कल्पना काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांनाही दिली आहे.

सांगली जिल्हा राष्टÑवादीला गेल्या चार वर्षांपासून वादाचे ग्रहण लागले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप व शिवसेनेचा आसरा घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचे अस्तित्व धोक्यात आले.

पक्षांतर्गत वाद, नाराजी यावर वेळीच तोडगा काढला गेला नसल्याने या गोष्टी घडत गेल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाची वाईट स्थिती होत असताना, महापालिका क्षेत्रातील ताकद अबाधित राहिली, मात्र गेल्या दोन वर्षापासून महापालिका क्षेत्रातही पक्षांतर्गत वादाने तोंड वर काढले. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यात दोन गट पडले आहेत.

बजाज यांच्या कार्यपद्धतीबद्दल कमलाकर पाटील गटाला आक्षेप आहेत, तर कमलाकर पाटील यांचा गट पक्षविरोधी कृती करीत असल्याचे बजाज समर्थकांचे मत आहे. दोन्हीही गट एकमेकांच्या विरोधात उघडपणे संघर्ष करताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या महाआरोग्य शिबिराला कमलाकर पाटील यांच्या गटातील बहुतांश कार्यकर्ते, नगरसेवक अनुपस्थित राहिले होते.रुसवाफुगवी कायम...युवक राष्टÑवादी व अन्य सेलमधील पदांच्या वाटपावरूनही दोन्ही गटात वाद निर्माण झाले होते. पक्षात वर्चस्ववादाची लढाई दोन्ही गटात सुरू आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्या गटाचे वर्चस्व अधिक राहणार, हा चर्चेचा विषय बनला आहे. निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी स्थापन करण्यात येणाºया कमिटीतही वर्णी लागावी म्हणून काहींची धडपड सुरू आहे.