शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बिबट्यांनी केली पळता भुई, आता वाघोबांचीही सरबराई

By संतोष भिसे | Updated: October 23, 2023 17:59 IST

सांगलीकरांनो राजवाडा चौकात वाघ पाहण्याची तयारी ठेवा

संतोष भिसेसांगली : आजवर गवे, बिबटे आणि अन्य छोट्या-मोठ्या वन्य प्राण्यांच्या शिरकावाला सरावलेल्या सांगलीकरांना आता चक्क वाघांची सवय करून घ्यावी लागणार आहे. ताडोबा अभयारण्यातील आठ वाघांना सह्याद्रीत सोडण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी मिळाल्याने वाघांचे आगमन निश्चित झाले आहे. त्यामुळे सांगलीत राजवाडा चौकात आता बिबट्यापाठोपाठ भविष्यात वाघही पाहण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.सामान्यत: गवताळ कुरणांत वावरणाऱ्या वाघांसाठी सह्याद्रीचे खोरे अनुकूल नाही. डोंगरदऱ्या आणि कडेकपारीमध्ये तो टिकण्याची शक्यता नाही. चांदोली, कोयना, तिलारी हा जंगल परिसर कुरणांचा नसून डोंगरकपारीचा आहे. वन विभागाच्या प्राणी गणनेत या परिसरात सात वाघ आढळले आहेत, पण ते स्थायिक नाहीत. गोव्यापासून राधानगरीपर्यंत भटकंती करणारे आहेत. त्यात आता नव्याने आठ वाघांची भर पडणार आहे. स्वत:चा भ्रमण परिसर निश्चित करण्यासाठी या वाघांमध्ये संघर्ष पेटू शकतो. त्यातून सह्याद्रीच्या खोऱ्याबाहेर रहिवासी परिसरात येण्याची भीती आहे.सध्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक गावांत बिबट्यांचा वावर आढळतो. सांगली जिल्ह्यात तर सरासरी आठवड्याला एक-दोन गावांत बिबट्या आल्याच्या बातम्या येतात. आता या गावांमध्ये वाघ आल्याच्या घटनाही घडल्यास नवल नसावे.

राजवाडा चौकात वाघ पाहण्याची तयारी ठेवासांगली शहराला गवे नवे नाहीत. राजवाडा चौकात काही महिन्यांपूर्वी चक्क बिबट्याही अवतरला होता. सांगलीकरांसाठी ती भीतीदायक अपूर्वाई होती. भविष्यात या चौकात वाघानेही फेरफटका मारल्यास नवल नसावे. सांगलीकरांना वाघ पाहण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नसेल, वाघच माणसे पाहायला शहरात येऊ शकेल.काही प्रश्न, काही शंका

  • वाघाला हवीत गवताळ कुरणे गरज, ती कोठे मिळणार?
  • सह्याद्रीतील वाघ स्थलांतर करणारे, ते शहरात येणार नाहीत याची हमी काय?
  • तृणभक्षी हरीण, सांबर आदी प्राणी म्हणजे वाघांचे अन्न, ते पुरेसे उपलब्ध आहे का?
  • उपलब्ध हरणांचा फडशा पाडल्यावर शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांकडे मोर्चा वळणार?

विदर्भातील वाघ सह्याद्रीच्या खोऱ्यात सोडणे व्यवहार्य नाही. चांदोलीचे जंगल लांबीला जास्त व रुंदीला कमी आहे. त्यामुळे नव्या वाघांमध्ये आपली हद्द निश्चितीसाठी संघर्ष पेटू शकतो. त्यातून ते जंगलाबाहेर लगतच्या गावांत येण्याचा धोका आहे. पुरेशा खाद्याअभावी उपासमारही होऊ शकते. सध्या सह्याद्रीच्या खोऱ्यात सात वाघ असल्याचे वन विभाग सांगत असला, तरी सध्या त्यातील किती जिवंत किंवा सक्रिय आहेत हेदेखील पाहावे लागेल. - अजित (पापा) पाटील, मानद वन्य जीवरक्षक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीTigerवाघforest departmentवनविभाग