सांगली : लाखमोलाचे वाहन खरेदी केल्यानंतर तितक्याच लाखमोलाचा त्याला नंबरही असावा, असे प्रत्येकाला वाटते आणि त्यामुळेच जिल्ह्यात वाहन खरेदीबरोबरच फॅन्सी नंबरलाच जास्त पसंती मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळातही वाहन खरेदी काहीशी रोडावली असली तरी ‘लकी’ नंबरसाठीचे प्राधान्य कमी झालेले नाही. यामुळे आरटीओ विभागालाही चांगला महसूल मिळत आहे.
वाहनाबरोबरच चांगला क्रमांक असावा, यासाठी प्रत्येकजण प्राधान्य देत असतो. त्यातही नवीन वाहनासाठी सात अथवा नऊ अंकी बेरीज येईल, असा क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासह अनेकजण अंकशास्त्राचा आधार घेऊन चांगला क्रमांक मिळवतात. कोरोनामुळे दीड वर्षांपासून परिस्थिती बिघडलेली असतानाही चांगला क्रमांक मिळवण्यासाठी अनेकजण रितसर अर्ज करून व शासनदरबारी त्याला निर्धारित केलेली फी भरून क्रमांक मिळवत आहेत. आरटीओ कार्यालयामार्फतही नवीन सिरीयल सुरू होताच लकी क्रमांकासाठीची लिलाव प्रक्रिया राबवली जात आहे. यामुळे वाहनधारकांना चांगला क्रमांक मिळवल्याचे समाधान मिळत आहे तर शासनाकडेही महसूल जमा होत आहे.
चौकट
...तर नंबरसाठी होतो लिलाव
१) प्रशासनातर्फे नवीन सिरीयल सुरु होताच पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येते. २) दिलेल्या मुदतीत आलेल्या अर्जानुसार विहीत शुल्क भरून नंबर अदा केले जातात. मात्र, एकाच क्रमांकासाठी जादा अर्ज आल्यास लिलाव प्रक्रिया होते.
३) लिलाव प्रक्रियेत जो वाहनधारक सर्वाधिक बोली लावेल त्याला तो नंबर दिला जातो. या प्रक्रियेतून शासनाला चांगला महसूल प्राप्त होतो.
चौकट
कोरोना काळातही हौसेला मोल नाही
* गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेला कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत वाहन विक्रीवरही परिणाम झाला आहे.
* लॉकडाऊनमुळे वाहनविक्री करणारे शोरुम बंद असल्यानेही विक्री घटण्याबरोबरच आरटीओकडील वाहनांची नोंद कमी झाली आहे.
* अशा स्थितीतही खरेदी केलेल्या वाहनांसाठी फॅन्सी नंबर मिळावा, यासाठी बहुतांशजण उत्सुक आहेत.
चौकट
या तीन नंबर्सना सर्वाधिक मागणी
००७
१
९९९९
या नंबरचा रेट सर्वात जास्त
१ १,००,०००
९९९९ १५००००
७७७७ ७००००
चाैकट
आरटीओ विभागाची कमाई
२०१९ ३,९८,२८,०००
२०२० १,८६,२६,०००
२०२१ मे ----------------