शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

सांगलीत सर्वपक्षीय जेलभरो

By admin | Updated: June 8, 2017 23:25 IST

सांगलीत सर्वपक्षीय जेलभरो

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी कृती समितीच्यावतीने गुरुवारी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. त्यानंतर पोलिसांनी दोनशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व काही वेळात त्यांना सोडूनही दिले. राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा गुरुवारी आठवा दिवस होता. सांगली जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन शेतकरी कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरू आहे. गुरुवारी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले होते. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ समितीचे कार्यकर्ते जमा झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करुन निदर्शने करण्यात आली. शासनाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तेथून सर्व कार्यकर्ते चालत शेजारीच असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या आवारात गेले. पोलिस ठाण्यात कार्यकर्ते घुसू नयेत, यासाठी पोलिसांनी त्यांना ठाण्याच्या प्रवेशद्वाजवळ रोखून धरले. तेथेही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, अशी घोषणाबाजी झाली. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. शिष्टमंडळाने बोराटे यांना निवेदन दिले. जोपर्यंत सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आला.आंदोलनात किसान सभेचे कॉ. उमेश देशमुख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मनसेचे अमर पडळकर, जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, कॉ. शंकर पुजारी, कॉ. सुमन पुजारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, अवामि विकास पार्टीचे अशरफ वांकर, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, हिंद मजदूर सभेचे विकास मगदूम, सतीश साखळकर, अशोक माने, नगरसेवक बाळासाहेब काकडे, शेडजी मोहिते, संतोष पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, हरिदास पाटील, पद्माकर जगदाळे, असिफ बावा आदी सहभागी होते.कडेकोट बंदोबस्तकारवाईची कोणतीही नोटीस न देता बुधवारी कॉ. उमेश देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, अ‍ॅड. अमित शिंदे, अ‍ॅड. सुधीर गावडे यांच्यासह आठजणांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याने प्रकरण चिघळले होते. पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. त्यामुळे गुरुवारच्या जेलभरो आंदोलनात असा प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.