शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कृष्णेची पाणी पातळी २३ फुटांवर

By admin | Updated: August 5, 2016 02:03 IST

वेगाने वाढ : दिवसभर रंगला ऊन-पावसाचा खेळ; चोवीस तासात नदीचे पाच फुटाने पाणी वाढले

सांगली : चांदोली धरणातील विसर्गामुळे वारणेचे पाणी पात्राबाहेर पडले असतानाच, आता संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी आता २३ फुटांवर गेली आहे. चोवीस तासात पाच फुटाने पाणी वाढले आहे. पावसाचा जोर कायम राहिला, तर शुक्रवारी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने जोर लावला आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यातच चांदोली धरणातील विसर्गामुळे आता हरिपुरातील संगमाच्या ठिकाणी वारणा नदीच्या पाण्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे हरिपूर ते मिरज या पट्ट्यात नदीचे पात्र विस्तारत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ बुधवारी सायंकाळी १८ फूट पाणी पातळी होती. गुरुवारी सायंकाळी ती २३ फुटांवर गेली होती. त्यामुळे कृष्णाकाठीही आता चिंतेचे वातावरण पसरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जुलैप्रमाणेच आॅगस्टमध्येही शहराच्या नदीकाठच्या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झाला, तर पुराचा धोका टळू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या लोकांचे लक्ष पावसाकडे आणि वाढणाऱ्या नदीच्या पाणी पातळीकडे लागले आहे. गेल्या चोवीस तासात सांगली, मिरज, इस्लामपूर, पलूस, तासगाव, शिराळा, विटा याठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या. सांगली, मिरज परिसरात गुरुवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. काहीवेळ इंद्रधनुष्यानेही या वातावरणात रंग भरले. पावसाचा मुक्काम कायम असल्याने सांगली, मिरजेला जलमय स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्ते, क्रीडांगणे, सखल भाग, गुंठेवारी, खुले भूखंड, प्लॉट अशा सर्वच ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहिले आहे. पावसामुळे शहरातील वाहतूक गुरुवारी तिसऱ्यादिवशीही विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनधारकांचे हाल सुरू आहेत. (प्रतिनिधी)‘चांदोली’त अतिवृष्टी : वारणा पात्राबाहेरवारणावती : चांदोली धरण परिसरात सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने तीन दिवसात २.८ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. पावसामुळे वारणा धरणात प्रचंड प्रमाणात पाणी येत असल्याने धरणाच्या वीज निर्मिर्ती केंद्रातून ८६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे. शिराळा तालुक्याचे पश्चिम विभागात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अतिवृष्टी झाली आहे. गेल्या चोवीस तासात ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एकू ण १७४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात सलग चार दिवस पावसाचा जोर कायम असल्याने अतिवृष्टीची नोंद झाली होती. यावेळीही सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने अतिवृष्टी होत आहे. यामुळे चांदोली धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. वाढत्या पाण्याचा विचार आणि मुसळधार पाऊस यामुळे जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू क रण्यात आला आहे. ८६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग व ओढ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. वारणा नदीच्या पोटमळीतील ऊस व भात पिकात पाणी घुसले आहे.