शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भारनियमनाने पाणीटंचाई

By admin | Updated: June 21, 2017 00:51 IST

एक्स्प्रेस फिडरचे कोट्यवधी वाया : आयुक्तांच्या नोटिशीला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून सांगली व कुपवाड या दोन शहरातील नागरिकांना मंगळवारी पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी एक्स्प्रेस फिडरवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण हा खर्च आता पाण्यात गेला आहे. त्यात आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पाणीपुरवठ्याची वीज खंडीत केल्यास आपत्ती निवारण कायद्यान्वये कारवाई करण्याची नोटीसही वीज मंडळाला बजाविली होती. पण या नोटिशीलाही वीज कंपनीने केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. सांगली व कुपवाड शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी विकास महाआघाडीच्या काळात एक्स्प्रेस फिडर बसविण्यात आले. या फिडरपोटी महापालिकेने मोक्याच्या जागा वीज कंपनीला दिल्या. एक्स्प्रेस फिडर होऊन सात-आठ वर्षे होत आली, तरीही एक्स्प्रेस फिडरचा फायदा अद्यापही महापालिकेला मिळू शकला नाही. उलट वीज मंडळाने आपला स्वायत्तपणा दाखवत दर मंगळवारी कामासाठी दिवसभर भारनियमन सुरुच ठेवले आहे. यामुळे ज्या ज्या वेळेला मंगळवारी वीजपुरवठा खंडीत होतो,तेव्हा तेव्हा शहराला पाणीटंचाईची झळ बसते. केवळ मंगळवारपुरताच हा विषय मर्यादित रहात नाही. त्यानंतर सलग दोन दिवस सांगली व कुपवाडचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतो. महापालिका प्रशासनाला, पदाधिकाऱ्यांच्या आदेशालाही वीज मंडळ जुमानतच नाही. गेल्या काही महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे महापालिकेवर येत आहेत. त्याचीच दखल घेत काही दिवसापूर्वी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत वीज मंडळाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत वीज मंडळाला नोटीसही बजावली होती. या नोटिशीलाही वीज मंडळाने अक्षरश: केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते. त्याचा प्रत्यय पुन्हा मंगळवारी आला. दिवसभर शहराचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे सांगली व कुपवाड या दोन शहराला सकाळी आठनंतर पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दोन्ही शहरातील गावठाण व उपनगरात पाण्याची टंचाई जाणवत होती. काही भागात महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला. सातत्याने वीज पुरवठा खंडीत होऊन त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.