शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेने जलजीवन योजनेच्या तब्बल १०० ठेकेदारांना ठोठावला १० लाखांचा दंड

By संतोष भिसे | Updated: April 21, 2024 18:45 IST

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या १०० हून अधिक कंत्राटदारांना जिल्हा परिषदेने दंड ठोठावला आहे.  

सांगली : जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या १०० हून अधिक कंत्राटदारांना जिल्हा परिषदेने दंड ठोठावला आहे.  गेल्या जानेवारीपासूनच्या तीन महिन्यांत १० लाख रुपयांहून अधिक दंडाची वसुली केली आहे.जिल्ह्यात जलजीवन योजनेअंर्तगत पाणीपुरवठ्याच्या ६८३ योजनांची कामे सुरु आहेत. त्यांची कामे फारच मंद गतीने सुरु आहेत. फेब्रुवारीअखेर २१४ कामे पूर्ण झाली असून १२७ योजना ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आली आहेत.

योजनांची गती वाढविण्यासाठी ग्रामिण पाणीपुरवठा विभागाने कंत्राटदारांकडे पाठपुरावा सुरु केला आहे. बहुतांश कामांमध्ये त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्याचे आढळले आहे. मजुर सोसायट्या, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मोठ्या ठेकेदारांनी ही कामे घेतली आहेत. त्यापैकी काही ठेकेदारांनी कार्यारंभ आदेश मिळूनही काम सुरु केलेले नाही. काही ठेकेदारांनी कामाची मुदत संपली, तरी शुभारंभाचा नारळ फोडलेला नाही. काही ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडली आहेत, तर काहींची कामे अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात झाली आहेत.

कामे रखडत ठेवणाऱ्या ठेकेदारांना पाणीपुरवठा विभागाने वेळोवेळी नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर दंडाची आकारणी केली आहे. गेल्या जानेवारीपासून अशा १०० ठेकेदारांवर दंडाच्या कारवाया करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी सांगितले.

काळ्या यादीत टाकण्याचा इशारा

पाडळी (ता. शिराळा) येथे पाण्याच्या टाकीचे काम मुदतीनंतरही पूर्ण न करणाऱ्या नीलम शिवाजी लवटे (रा. बुधगाव) या सुशिक्षित बेरोजगार अभियंता ठेकेदाराला जिल्हा परिषदेने काळ्या यादीत टाकले. पुढील तीन वर्षे त्यांना जिल्हा परिषदेचे कोणतेही काम मिळणार नाही. कामे गतीने पूर्ण न करणाऱ्या आणखी काही ठेकेदारांवर अशा कारवाईची शक्यता आहे.

जलजीवन योजनेची कामे गतीने होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. काही ठिकाणी जागा न मिळणे, स्थानिक राजकारण किंवा अन्य प्रतिकूल कारणांनी कामे रखडत आहेत. अशा ठिकाणी कारवाई केली जात नाही. पण कोणतेही सबळ कारण नसतानाही कामे रखडल्यास कारवाईशिवाय पर्याय नाही. - संजय येवले, कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद

टॅग्स :Sangliसांगली