शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

Sangli: सेल्फी काढताना तरुण नदी पात्रात पडून वाहून गेला, सांगलीवाडीतील बंधाऱ्याजवळील घटना

By घनशाम नवाथे | Updated: July 7, 2024 18:28 IST

Sangli News: सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला असलेल्या बंधा-यावर मैत्रिणीसमवेल सेल्फी घेताना मोईन मोमीन (वय २४, रा. शामरावनगर) हा तरूण पात्रात पडून वाहून गेला.

- घनशाम नवाथे सांगली - येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला असलेल्या बंधा-यावर मैत्रिणीसमवेल सेल्फी घेताना मोईन मोमीन (वय २४, रा. शामरावनगर) हा तरूण पात्रात पडून वाहून गेला. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. मैत्रिणीने हा प्रकार नातेवाईकांना कळवल्यानंतर आयुष्य हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यू टीमच्यावतीने हरिपूरपर्यंत शोध घेण्यात आला. सायंकाळपर्यंत मोईन याचा ठावठिकाणा समजू शकला नाही.

अधिक माहिती अशी, मोईन हा सांगलीतील एका मैत्रिणीबरोबर रविवारी सकाळी नदीकाठावर आला होता. सांगलीवाडीच्या बाजूने तो मैत्रिणीसह चालत बंधाऱ्यावर आला. तेथे दोघेजण सेल्फी घेत होते. तेव्हा तोल जाऊन मोईन हा नदीपात्रात पडला. तेव्हा नदीतील पाण्याला धार असल्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही. तो पाण्याबरोबर वाहून जाऊ लागला. मैत्रिणीने आरडाओरड केला. काहीजण बंधाऱ्याकडे धावले. परंतू मोईन हा पाण्याच्या धारेला लागून दूरवर गेला. मैत्रिणीने मोईनच्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. ते तत्काळ धावले. सांगली शहर पोलिसही घटनास्थळी आले. आयुष हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि महापालिका अग्निशमन दलाचे जवानही आले. त्यांनी बोटीतून हरिपूरपर्यंत शोध घेतला. परंतू तोपर्यंत नदीपात्रात पाणी वाढले होते. बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे प्रवाहाचा वेग वाढला. सायंकाळपर्यंत नदीपात्रात शोध सुरू होता.

टॅग्स :Sangliसांगली