शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

राज्य अजिंक्यपद हॅण्डबॉल स्पर्धेत मुलांत सांगली, तर मुलींत मुंबई संघाला अजिंक्यपद

By संतोष भिसे | Updated: February 6, 2024 16:39 IST

सांगलीत स्पर्धा, राज्यभरातून ५०० खेळाडूंचा सहभाग

सांगली : सांगलीत आयोजित राज्य अजिंक्यपद हॅण्डबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात यजमान सांगली जिल्ह्याने वर्चस्व गाजवत अजिंक्यपदाच्या चषकावर नाव कोरले. एकतर्फी लढतीत जळगाव जिल्ह्याचा १९-३ असा पराभव केला. मुलींमध्ये मुंबई व लातूर संघात तुल्यबळ लढत झाली. मुंबई शहर जिल्ह्याने लातूरचा १९-१२ असा पराभव करत जयश्रीवहिनी चषक पटकावला.सांगली डिस्ट्रिक्ट हँडबॉल असोसिएशन आणि मदनभाऊ पाटील युवा मंचतर्फे दामाणी हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धा घेण्यात आल्या. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत ५०० खेळाडू सहभागी झाले. मुलांच्या अंतिम फेरीत बलाढ्य सांगलीने जळगाववर पहिल्या मिनिटापासून दवाब निर्माण करीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. विजयी संघात हर्षवर्धन करे, प्रज्वल काळे, सर्वज्ञ पाटील, मिथील जाधव यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

मुलींमध्ये लातूरच्या श्रेया पवारने एकटीने ७ गोल करीत संघासाठी किल्ला लढवला, परंतु मुंबईने सांघिक एकजुटीवर १९-१२ अशी विजयश्री खेचून आणण्यात यश मिळविले. मुंबईकडून काव्या जगतापने ६, अजिता नाडरने ६, स्वरा टक्केने ५, विर्तिका नायरने २ गोल केले.भारती बँकेचे संचालक डॉ. जितेश कदम, डॉ. मोनिका जितेश कदम, सोनिया होळकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक प्रदान करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील, युवा मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे, किरण जगदाळे,सुधीर सगरे, इरशाद तांबोळी, नईम नालबंद, वाय. डी. पाटील, मुख्याधापिका बी. एम. पाटील, प्रा. प्रवीण गावडे, वैभव उगळे आणि वसंत देसाई उपस्थित होते. संयोजन प्रा. जहांगीर तांबोळी, परेश पाटील, प्रा. प्रदीपकुमार चव्हाण, प्रा. स्वाती शिरोटे, प्रा. वर्षा लोखंडे, संजय पवार, धुळा इरकर यांनी केले.

टॅग्स :Sangliसांगली