शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

एका पावसात सांगली जलमय

By admin | Updated: June 10, 2015 00:29 IST

मुसळधार पावसाने झोडपले : गुंठेवारीची दैना, शहरवासीयांच्या नशिबी वनवास

सांगली : मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने सांगली शहर जलयम झाले. शहरातील स्टेशन चौक, मारुती चौक, झुलेलाल चौकात गुडघाभर पाणी साचले होते, तर उपनगरे चिखलात रुतली होती. गुंठेवारीतील नागरिकांची तर दैना उडाली असून सर्वत्र दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल दीड तास पावसाने झोडपून काढले. या पावसाने शहरवासीयांची दैना उडाली. शासकीय कर्मचारी कार्यालयातच अडकून पडले होते. शहरातील स्टेशन चौकात गुडघाभर पाणी साचून होते. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची तारांबळ उडत होती. अनेक वाहने रस्त्यावर बंद पडली होती. स्टेशन चौकाच्या दुतर्फा पाणी साचून होते. महापालिका मुख्यालय, काँग्रेस भवनसमोर पाणी होते. आंबेडकर क्रीडांगणालाही तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. झुलेलाल चौक, मारुती चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मारुती चौकातील भाजी, फळ विक्रेत्यांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. गुंठेवारीत पालिकेने ड्रेनेजच्या चरी खोदल्या आहेत. उपनगरांत पाणी व ड्रेनेजसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खुदाई झाली आहे. या चरी अद्याप बुजविलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. शामरावनगर, आप्पासाहेब पाटीलनगर येथे पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा नसल्याने, रस्ते, गटारी, भूखंडावरून पाणी वाहत होते. (प्रतिनिधी)$$्निरेल्वे रुळ पाण्यात !विश्रामबाग येथील रेल्वे रूळ प्रथमच पाण्यात गेला होता. त्यामुळे रेल्वेची वाहतूकही संथगतीने सुरू होती. मारुती चौक पूर्णत: पाण्याखाली गेला होता. आनंद चित्रमंदिरापर्यंत पाणी शिरले होते. राजवाडा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून होते. झुलेलाल चौक, आंबेडकर रस्ता पाण्याखाली होता.शामरावनगर, आप्पासाहेब पाटीलनगर, रामकृष्ण सोसायटी, त्रिमूर्ती कॉलनी परिसरात चिखलाचे साम्राज्यशहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक दोन तास विस्कळीत