शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : शेतकरी बिलांच्या प्रतीक्षेत, साखरेच्या दराची घसरणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:40 IST

सांगली जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. तरीही जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांची शंभर टक्के उसाची बिले दिली नाहीत. माणगंगा (आटपाडी) २८ टक्के, तर महांकाली (कवठेमहांकाळ) यांनी केवळ ५० टक्केच बिले दिली आहेत.

ठळक मुद्देशेतकरी बिलांच्या प्रतीक्षेत, साखरेच्या दराची घसरणच माणगंगाकडून २, तर महांकालीची ५० टक्के बिले अदा

सांगली : जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. तरीही जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांची शंभर टक्के उसाची बिले दिली नाहीत. माणगंगा (आटपाडी) २८ टक्के, तर महांकाली (कवठेमहांकाळ) यांनी केवळ ५० टक्केच बिले दिली आहेत. सध्या कारखाने कधी ऊस बिले देणार याकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी विक्रमी ९८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याप्रमाणेच महाराष्ट्रात आणि देशातही साखरेचे उत्पादन जादाच झाले आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या साखरेचे दर कमीच होत आहेत.

गुरुवारी प्रति क्विंटल साखर २८०० ते २७०० रुपये दर असल्याचे साखर कारखानदार आणि साखर व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून साखरेचे दर कमीच होत असल्यामुळे कारखानदारांची आर्थिक कोंडी झाली आहे.

राज्य बँकेनेही साखरेच्या पोत्यांचे मूल्यांकन कमी केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देण्यात अडचणी येत असल्याचे साखर कारखानदार सांगत आहेत. हे जरी खरे असले तरी एफआरपीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही कारखानदारांकडून शेतकऱ्यांना बिले मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

याबद्दल साखर संचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता, सांगली जिल्ह्यातील वसंतदादा (श्री दत्त इंडिया) आणि मोहनराव शिंदे याच कारखान्यांनी बिले दिली आहेत. उर्वरित १३ साखर कारखान्यांनी अद्याप बिले दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे.आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याने दि. १५ एप्रिलपर्यंत सर्वात कमी म्हणजे केवळ २८ टक्केच बिले दिली आहेत. या कारखाना प्रशासनावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

महांकाली साखर कारखान्यानेही ५० टक्केपर्यंतच बिले दिली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची बिले मिळाली नाहीत. या कारखान्यांबद्दलही साखर आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी झाल्या आहेत. त्यानुसार या कारखान्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री या साखर कारखाना प्रशासनानेही ७४ टक्के शेतकºयांनाच बिले दिली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची बिले थांबली आहेत. हुतात्मा, सोनहिरा, विश्वासराव नाईक, राजारामबापू या साखर कारखान्यांनीही अद्याप शेतकऱ्यांना शंभर टक्के रक्कम दिली नसल्याचे साखर आयुक्त कार्यालयातील आकडेवारीवरुन दिसत आहे.शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांकडे बलाबाबत तक्रारी केल्यानंतर, साखरेचे दर उतरले असल्याचे एकमेव कारण सांगितले जात आहे. साखर कारखानदारांकडून बिले मिळत नसल्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने न्याय देण्याची गरज आहे, अशी मागणीही ऊस उत्पादक शेतकरी करु लागला आहे. याकडे सरकार आणि संघटनांचेही लक्ष नाही.कारखान्यांच्या घोषणा हवेतजिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गळीत हंगाम चालू करताना एफआरपी आणि अधिक २०० रुपये दराची घोषणा केली होती. या घोषणेप्रमाणे कारखान्यांनी बिले दिली नाहीत. अनेक कारखान्यांनी एफआरपीचीही रक्कम दिली नाही. यामुळे कारखानदारांना घोषणेचा विसरच पडला की काय?, असा शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे.साखरेचे दर कमी झाले आहेत ही वस्तुस्थित लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने घोषणा केलेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची गरज आहे. पण, सरकारही घोषणा करण्यातच धन्यता मानत आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने