शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : मतदारांनी रंगीत छायाचित्रे 15 एप्रिल पूर्वी जमा करावीत : काळम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 17:29 IST

ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत किंवा कृष्णधवल आहेत, अशा मतदारांनी दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी त्यांचे अलिकडच्या काळातील रंगीत फोटो जमा करावेत. दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी फोटो जमा न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील नियम 22 नुसार संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देमतदारांनी रंगीत छायाचित्रे 15 एप्रिल पूर्वी जमा करावीत : काळमफोटो जमा न केल्यास नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार

सांगली : ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत किंवा कृष्णधवल आहेत, अशा मतदारांनी दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी त्यांचे अलिकडच्या काळातील रंगीत फोटो जमा करावेत. दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी फोटो जमा न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील नियम 22 नुसार संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी स्पष्ट केले आहे.जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून अचूक, परिपूर्ण व 100 टक्के रंगीत छायाचित्रयुक्त मतदार याद्या तयार करण्याबाबत भारत निवडणूक आयोग व प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून निर्देश प्राप्त झाले आहेत.

दिनांक 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये फोटो नसलेले 81 हजार 10 इतके मतदार आहेत. तसेच 71 हजार 817 इतक्या मतदारांचे फोटो कृष्णधवल आहेत.ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत किंवा कृष्णधवल आहेत, अशा मतदारांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत आगाऊ नोटीस देण्यात येणार आहे.

या नोटीसीस अनुसरून संबंधित मतदारांनी त्यांचा अलिकडच्या काळातील रंगीत फोटो त्यांच्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसिल कार्यालयात जमा करावेत.

सांगली विधानसभा मतदार संघातील मतदारांनी त्यांचे रंगीत फोटो जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीcollectorतहसीलदार