शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दोन बंद घरे फोडली, सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 20:18 IST

सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन बंद घरे फोडली. दोन्ही घरातील सोन्याचे दागिने, कॅमेरा व रोकड असा दोन लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला.

सांगली : सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन बंद घरे फोडली. दोन्ही घरातील सोन्याचे दागिने, कॅमेरा व रोकड असा दोन लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला.खणभागातील आझाद व्यायाम मंडळाजवळ ओंकार अपार्टमेंटमध्ये संतोष नामदेव गरड राहतात. गुरुवारी सकाळी ते कुटुंबासह परगावी गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटून प्रवेश केला. बेडरुममधील कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमध्ये डबा होता. या डब्यातील सोन्याचे दोन ग्रॅमचे गंठण, दीड ग्रॅमची कर्णफुले, दोन ग्रॅमची चेन व चांदीचे ब्रेसलेट असा एक लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी सहा वाजता गरड कुटुंबासह घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.विश्रामबाग हद्दीत पार्श्वनाथ कॉलनीत पौर्णिमा श्रीपाद खिरे यांचा कौमुदी बंगला आहे. त्याचे पती श्रीपाद खरे सांगली अर्बन बँकेत संचालक आहेत. ते गुरुवारी बँकेच्या कामासाठी मुंबईला गेले होती. घरी पौर्णिमा खिरे एकट्याच होत्या. त्याही रात्री बंगल्याला कुलूप लाऊन मालू हायस्कूलजवळील नातेवाईक प्रसन्न करंदीकर यांच्या घरी मुक्कामास गेल्या होत्या. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ३० हजारांचा कॅमेरा, ४० हजारांची रोकड असा ९५ हजारांचा माल लंपास केला. शुक्रवारी सकाळी पौर्णिमा खिरे घरी गेल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुपारपर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरु होते.तिसरी घरफोडीगेल्या चार दिवसातचोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसापूर्वी संजयनगरमधील रजपूत मळ्यातील लिलावती अर्पामेंटमध्ये राहणारे राहूल नागराळे यांचा फ्लॅट फोडून ६८ हजाराचा ऐवज लंपास केला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी चोरट्यांनी पुन्हा एक फ्लॅट व बंगला फोडून सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास केला. चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांना आव्हान बनले आहे.