सांगली : शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापन उपक्रमात माहिती भरण्यात सांगली जिल्हा अव्वल स्थानावर आहे. शिक्षणाची मानके सुधारण्यासाठी हा राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
याअंतर्गत सरकारी व खासगी सर्व माध्यमांच्या शाळांनी स्वयंमूल्यमापन दरवर्षी करायचे आहे. त्याचा तपशील ऑनलाइन भरायचा आहे. शाळांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी निकष निश्चित केले आहेत. ‘अ’ श्रेणीतील शाळांचे बाह्यमूल्यमापन विद्या प्राधिकरणामार्फत केले जाते. त्यांना एसएस २०२०-२१ प्रमाणपत्र देऊन प्रमाणित केले जाते.
जिल्ह्यातील २,९६६ पैकी २,९२५ शाळांनी स्वयंमूल्यमापनासाठी ऑनलाइन माहिती भरली होती. माहिती भरण्यात सांगली जिल्हा अव्वल असल्याचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कामिगरी केल्याचे कांबळे म्हणाले.