शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : आवंढी गावातील जलसंधारणासाठी मुख्यमंत्र्यांनी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:53 IST

आवंढी येथे पाणी फौंडेशनच्या वतीने हाती घेतलेले जलसंधारणाचे अभूतपूर्व काम आहे. आवंढी ग्रामस्थांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी केलेली एकजूट राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देआवंढी गावातील जलसंधारणासाठी मुख्यमंत्र्यांनी केले श्रमदानसांगली जिल्हा दौऱ्यात पाणी फौंडेशनच्या कामाची फडणवीस यांनी केली पाहणी

सांगली : आवंढी येथे पाणी फौंडेशनच्या वतीने हाती घेतलेले जलसंधारणाचे अभूतपूर्व काम आहे. आवंढी ग्रामस्थांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी केलेली एकजूट राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शुक्रवारी जत तालुक्यातील आवंढी गावात पाणी फौंडेशनतर्फे केलेल्या जलसंधारणाच्या कामाची केवळ पाहणीच नाही, तर चक्क तेथे श्रमदान करुन ग्रामस्थांशीही संवाद साधला.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने गेल्या तीन वषार्पासून जलसंधारणाचे भरीव काम हाती घेतले आहे. मोठ्या धरणांच्या बरोबरीने दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियानातून पाण्याचे विज्ञान समजून घेवून काम केल्याने दुष्काळमुक्तीचे समाधान मिळाल्याचे ते म्हणाले.राज्यात आतापर्यंत जलयुक्त शिवार अभियानातून ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली तर यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त करीत आहोत. जलयुक्त शिवार योजनेमध्ये जनतेचा सहभाग घेतल्याने ग्रामस्थांनाही ही कामे आपली वाटू लागली आहेत.

त्यामुळे गावातील पाण्याचा थेंब न थेंब शास्त्रयुक्त पध्दतीने गावाच्या शिवारात अडविला जात आहे. आज राज्यातील सर्व गावांचा धर्म, जात, पार्टी, गट हे सर्व म्हणजे पाणी आहे. सर्वजण पाण्याकरीता काम करीत आहेत ही समाधानाची बाब आहे.पाणी फौंडेशनने जलसंधारणाच्या कामामध्ये घेतलेला पुढाकार आणि तयार केलेले मॉडेल महत्त्वाचे असून ग्रामस्थांना पाण्याचे शास्त्र समजून सांगितले आहे. पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत सहभागी असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.जलसंधारणाच्या कामासाठी ग्रामस्थांना येणारी डिझेलची समस्या निश्चितपणे दूर करू. तसेच जलसंधारणाचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSangliसांगली