शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : पॅनकार्ड क्लब्जमध्ये अडकले सांगलीचे ३५0 कोटी, एम. बी. मोरे : ३0 रोजी सांगलीत धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:37 IST

पॅनकार्ड क्लब्ज् लिमिटेड कंपनीत सांगली जिल्ह्यातील ५ लाख गुंतवणुकदारांचे ३५0 कोटी रुपये अडकले आहेत. तातडीने गुंतवणूकदारांचे पैसे मिळावेत, या मागणीसाठी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डीनेशन कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कमिटीचे सचिव एम. बी. मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपॅनकार्ड क्लब्जमध्ये अडकले सांगलीचे ३५0 कोटी: एम. बी. मोरे ३0 रोजी सांगलीत आंदोलन करण्यात येणार गुंतवणूकदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सांगली : पॅनकार्ड क्लब्ज् लिमिटेड कंपनीत सांगली जिल्ह्यातील ५ लाख गुंतवणुकदारांचे ३५0 कोटी रुपये अडकले आहेत. तातडीने गुंतवणूकदारांचे पैसे मिळावेत, या मागणीसाठी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डीनेशन कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कमिटीचे सचिव एम. बी. मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.मोरे म्हणाले की, राज्य व राज्याबाहेरील एकूण ५५ लाख गुंतवणुकदारांचे ८ हजार कोटी रुपये या कंपनीकडे अकडले आहेत. पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, असा आदेश १५ मे २0१७ रोजी सॅटने दिले होते.

मात्र सेबीकडून सध्या सुरू असलेल्या मालमत्ता विक्रीची प्रक्रिया संशयास्पद आहे. मिळकतींची किंमत ५0 ते ६0 टक्क्यांनी कमी केली जात आहे. कंपनीच्या सर्व मालमत्ता सिल करण्याचे आदेश असताना ८४ पैकी केवळ २७ मालमत्ताच सिल केल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सर्व पैसे कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे केंद्र शासनाने यामध्ये लक्ष घालून गुंतवणूकदारांना न्याय देणे गरजेचे आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आठ दिवसात सेबीकडून अहवाल मागितला होता. या घटनेस आता महिना झाला तरीही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे एकूणच सर्वच यंत्रणांची चालढकल यामध्ये सुरू आहे.

आमच्या संघटनेने यासाठी राज्यातील सर्व खासदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन यापूर्वी केले होते. तरीही शासनाने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही. कंपनीच्या मालमत्ता या सामान्य गुंतवणूकदारांच्याच आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्यावतीने किमान ६ तज्ज्ञांचा समावेश लिलाव प्रक्रियेत असावा, गुंतवणुकदारांची नावे व त्यांच्या रकमांची यादी तातडीने जाहीर करावी या मागण्या संघटनेने केल्या आहेत.येत्या ३0 जानेवारीस महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकाचवेळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सांगलीतील धरणे आंदोलनात येथील गुंतवणूकदार, एजंट यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.  यावेळी त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष एम. एल. साळवी, पी. एल. अग्रवाल, ए. एस. खोत, एस. टी. कचरे, आर. टी. सरगर, यु. आर. पाटील, एस. जी. जाधव, एस. बी. पिंजारी, एस. एस. ढवळे उपस्थित होते. 

टॅग्स :SangliसांगलीInvestmentगुंतवणूक