शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सांगली-पेठ रस्त्याची निविदा ११ रोजी उघडणार, ८८१ कोटींचा प्रकल्प, चारपदरी काँक्रीटचा रस्ता

By शीतल पाटील | Updated: May 7, 2023 13:10 IST

Sangli News: सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ८८१ कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा गुरुवार ११ मे रोजी उघडली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

- शीतल पाटील

सांगलीसांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ८८१ कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा गुरुवार ११ मे रोजी उघडली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. या कामासाठी देशभरातील वीसहून अधिक कंपन्यांनी प्री-बिडिंगमध्ये सहभाग घेतला होता.वाहनांची वाढती गर्दी, अपघातांचे वाढलेले प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे ४१ किलोमीटरचा सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावर अनेकांना जीव गमावावा लागला आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी पाच ते सहा वर्षांपासून लढा सुरू आहे. सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. त्यानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला.

महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून केंद्र शासनाला सादर केला होता. शासनाने या कामाला तत्त्वत: मंजुरीही दिली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी रस्त्यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आली. पण अर्थ समितीची मान्यता नसल्याने ठेकेदारांनी निविदा भरण्याबाबत सावध भूमिका घेतली. पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून मान्यता देण्याचा आग्रह धरला होता. अखेर दोन महि्न्यापूर्वी ८८१ कोटी ८७ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. ही निविदा गुरुवारी उघडली जाणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात निविदा उघडली जाणार होती. पण ठेकेदार कंपनींनी काही आक्षेप नोंदविल्याने निविदेला मुदतवाढ देण्यात आली होती.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकSangliसांगली