शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

सांगली : ग्रामीण रूग्णालय गरीब रुग्णांसाठी जीवनदायी मंदिर ठरावे : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:16 IST

माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून दुष्काळी, ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या, गरीब रुग्णाला रूग्णालय जीवनदायी मंदिर वाटले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देग्रामीण रूग्णालय गरीब रुग्णांसाठी जीवनदायी मंदिर ठरावे : सुभाष देशमुखमाडग्याळ ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन

सांगली : माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून दुष्काळी, ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या, गरीब रुग्णाला रूग्णालय जीवनदायी मंदिर वाटले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.माडग्याळ येथे बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे तसेच अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गडदे, डॉ. रवींद्र आरळी आदि मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, रुग्णाचा अर्धा आजार डॉक्टरच्या नीट बोलण्याने बरा होतो, त्यामुळे रुग्णांशी सकारात्मक संवाद साधा. त्यामुळे त्याला आजारावर मात करणे सोपे होईल. गरीब रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत उपचार मिळणार नाहीत, असे वाटता कामा नये, एवढ्या दर्जेदार आरोग्य सुविधा ग्रामीण भागात द्या, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून अनेक रुग्णांना मदत केली असून, गरजुनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.आमदार विलासराव जगताप म्हणाले, माडग्याळ मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणी मोठा आठवडी बाजार भरतो. त्यामुळे या ग्रामीण रूग्णालयामुळे लाभ जनतेची सोय होणार आहे. ग्रामीण रूग्णालय आणि अधिकारी, कर्मचारी निवासस्थानासाठी प्रत्येकी जवळपास 3 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.

जनतेच्या रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत गरजा पूर्ण करत आहोत. तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या रिक्त असणाऱ्या जागा भरल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित कामे मार्गी लागून विकासाला चालना मिळणार आहे. तसेच, प्रत्येक शेतकऱ्याला एक ट्रान्सफॉर्मर देण्याबाबत राज्य शासन विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSangliसांगलीhospitalहॉस्पिटल