शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सांगली :थकबाकी भरली, तरच पाणी,  टेंभू, म्हैसाळबाबत शासनाची भूमिका,  मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:34 IST

टेंभू उपसा सिंचन योजनेचे २१ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे ३४ कोटी रुपये वीज बिल थकीत असून यापैकी ५० टक्के थकबाकी शेतकऱ्यांनी भरली तरच योजना सुरू करू, अशी भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमोर मुंबईत मांडली.

ठळक मुद्देथकबाकी भरली, तरच पाणी, मुंबईत बैठकटेंभू, म्हैसाळबाबत शासनाची भूमिका थकबाकी भरल्यामुळे ताकारी योजनेचे आवर्तन सुरू

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे २१ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे ३४ कोटी रुपये वीज बिल थकीत असून यापैकी ५० टक्के थकबाकी शेतकऱ्यांनी भरली तरच योजना सुरू करू, अशी भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमोर मुंबईत मांडली.मुंबईत बुधवारी कालवा समितीची बैठक झाली. यावेळी जलसंपदामंत्री महाजन बोलत होते. या बैठकीस आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार भारत भालके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सांगोला येथील माजी आमदार दीपकआबा साळुंखे, सांगली पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच उपसा सिंचन योजनांचा आढावा सादर केला. टेंभू योजनेचे वीज बिल २१ कोटी आणि पाणीपट्टी ३५ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे वीज बिल ३४ कोटी आणि पाणीपट्टी ७१ कोटी अशी थकबाकी आहे. यापैकी काहीच वसुली झाली नसल्यामुळे वीज बिल भरणे कठीण झाले आहे.

ताकारी योजनेचे दहा कोटींचे वीज बिल आणि २९ कोटी पाणीपट्टीची थकबाकी आहे. यापैकी ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाच कोटी भरले आहेत. थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरु केल्याचे अधिकाºयांनी यावेळी सांगितले.त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले की, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकूण थकीत वीज बिलाच्या ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय या योजना चालू करता येणार नाहीत, शेतकऱ्यांनी वीज बिलाची रक्कम भरावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांचे प्रबोधन करावे.अधिकारीही वसुलीसाठी प्रयत्न करतील. वीज बिलाबरोबरच सिंचन योजना सुरळीत चालू राहण्यासाठी पाणीपट्टीचीही रक्कम नियमितपणे भरली पाहिजे. यासाठीही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.

सिंचन योजनांची थकबाकी

योजना       वीज बिल           पाणीपट्टी

म्हैसाळ            ३४ कोटी         ७१ कोटी

ताकारी             १० कोटी         २९ कोटीटेंभू                   २१ कोटी         ३५ कोटीसिंचन योजनेच्या प्रतीक्षेत शेतकरीशिवसेनेचे आ. अनिल बाबर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, टंचाई निधीतील १६ कोटी शासनाकडून उपलब्ध करून आणल्याचे मागील आठ दिवसांत सांगितले होते.लोकप्रतिनिधींच्या या घोषणेमुळे, पिकांना तात्काळ टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण, जलसंपदामंत्री महाजन आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, थकीत वीज बिलाच्या ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय योजना चालू करता येणार नसल्याचे बुधवारी सांगितले.त्यामुळे सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ताकारी योजनेची थकीत वीज बिलाच्या ५० टक्के रक्कम भरल्यामुळे ती योजना चालू झाली आहे. म्हैसाळ आणि टेंभू योजनेच्या पाण्यासाठी शेतकºयांना पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSangliसांगली