शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सांगलीत ‘रिक्षामामां’चा विद्यार्थी प्रवास महागला!

By admin | Updated: June 17, 2014 00:46 IST

संघटनांचा निर्णय : पन्नास ते शंभर रुपयांची दरवाढ

सचिन लाड, सांगली : पेट्रोल आणि डिझेलची सातत्याने दरवाढ होत असल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा संघटनांनी जून महिन्यापासून विद्यार्थी वाहतुकीत दरवाढ केली आहे. स्थानिक पातळीवर पन्नास रुपये आणि पाच किलोमीटर अंतर असेल तर शंभर रुपये दरवाढ झाली आहे. शालेय साहित्याबरोबरच ‘रिक्षावाले मामां’चा प्रवासही महागल्याने पालकांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. या दरवाढीबाबत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मात्र कोणतीही कल्पना दिलेली नाही. गेल्या चार-पाच वर्षात जिल्ह्यातील ३२६ शाळांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी बसची सोय केली आहे. चारचाकी वाहनांतूनही विद्यार्थी वाहतूक सुरू आहे, परंतु ‘रिक्षावाले मामां’साठी मागणी कायम आहे. मुलांना रिक्षातूनच शाळेत सोडण्याचा पालकांचा कल कायम आहे. क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी बसवले जातात. मात्र रिक्षाचा वाहतुकीचा दर परवडत असल्याने पालकांची शहरातील रिक्षा वाहतुकीबद्दल कोणतीही तक्रार नसते.