शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचा निकाल ६ तासात

By admin | Updated: May 13, 2014 11:10 IST

सांगली लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. एकूण २0 फेर्‍यात मतमोजणी होणार असून, एकाचवेळी १४ टेबलांवर ६0 हजार मतांची मोजणी केली जाणार आहे.

 

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. एकूण २0 फेर्‍यात मतमोजणी होणार असून, एकाचवेळी १४ टेबलांवर ६0 हजार मतांची मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी चारशे मिनिटे म्हणजे साडेसहा तासांचा कालावधी लागेल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  ते म्हणाले की, सांगली लोकसभा मतदार संघात साडेदहा लाख मतदान झाले आहे. तसेच चार हजार ३८८ मते पोस्टाद्वारे आली आहेत. या मतांच्या मोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. उद्या, मंगळवारी मतमोजणीची रंगीत तालीम होणार आहे. लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात १४ टेबलांवर एकाचवेळी मतमोजणी सुरू होईल. मिरज विधानसभेच्या २१ फेर्‍या, सांगली २१, पलूस-कडेगाव २0, खानापूर २४, तासगाव-कवठेमहांकाळ २१, जत २0 अशा सरासरी २0 फेर्‍या होतील. एका टेबलावर ७00 ते ८00 मतमोजणी गृहित धरता, एकावेळी ६0 हजार मतांची मोजणी होईल.  मतमोजणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरासह जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेरही १00 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असेल. मतमोजणीसाठी ६00 कर्मचारी नियुक्त केले आहेत.  निकालानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, कायदा मोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही कुशवाह यांनी दिला. (प्रतिनिधी) मिरवणुकांवर बंदी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निकालानंतर मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. दुचाकीचे सायलेंसर काढून दुचाकी फिरवून ध्वनिप्रदूषण करणार्‍यांवर प्रशासनाचा वॉच असेल. याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांनाही सूचना केल्या आहेत. राजकीय पक्षांनीही मिरवणुकीवरील बंदीला मान्यता दिल्याचे कुशवाह म्हणाले. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत म्हणाले, मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. केंद्रात शंभर, तर केंद्राबाहेर दीडशे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. सांगली, मिरजेत आठ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. हुल्लडबाजी करणार्‍यांना जागेवर पकडून चोप दिला जाणार आहे. मतमोजणीसाठी बंदोबस्त