शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गणरायाचे जल्लोषात स्वागत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:35 IST

सांगली : भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रंगीबेरंगी रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ ...

सांगली : भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रंगीबेरंगी रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ अशा मंगलमयी वातावरणात आणि बाप्पा मोरयाऽऽऽच्या गजरात गणरायाच्या सांगली नगरीत सोमवारी बाप्पांचे जल्लोषी आगमन झाले.महापुराच्या कटू आठवणी विसरून गणरायाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांना यावेळी त्याच्या स्वागताच्या तयारीला फारसा वेळ मिळाला नाही. तरीही गेल्या दोन दिवसात बाजारपेठांमध्ये खरेदीला झालेली गर्दी आणि सर्वत्र तयारीचा उत्साह दिसून आला. उत्साही लाटेवर स्वार होत भाविकांनी सोमवारी गणरायाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. पहाटेपासूनच घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू होती. त्यामुळे सकाळी सातपासूनच बाजार फुलला होता. दिवसभर सांगलीच्या हरभट रस्ता, मारुती रस्ता परिसरात साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. मारुती रस्ता, गावभाग, बसस्थानक परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक याठिकाणी मूर्ती खरेदीसाठी गर्दी होती. महापुरामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतल्यामुळे शहरात दिवसभर कुठेही सवाद्य मिरवणुका दिसल्या नाहीत. शांततेत आणि बाप्पा मोरयाच्या गजरात साध्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.भगव्या-पांढऱ्या टोप्या, शेला, फेटा परिधान करून पारंपरिक पद्धतीने मंडळांनी गणरायाचे स्वागत केले. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदा पारंपरिक ढोल-ताशा, लेझिम, झांजपथक यांना फाटा दिला. महापुरामुळे खर्चात काटकसर करीत मंडळांनी या गोष्टी टाळल्या. त्यामुळे वाद्यवादन पथकांना मोठा फटका बसला. सांगली शहर व परिसरात कार्यकर्त्यांची दिवसभर लगबग सुरू होती. यावेळी शहरात कोठेही देखावे नाहीत. देखावे, मंदिरांच्या प्रतिकृती, आरास यामुळे सांगलीचा गणेशोत्सव राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो, मात्र यंदा महापुरानंतर आलेल्या उत्सवातून देखावे, आरास यांना फाटा देण्यात आला आहे. गणरायाचे आगमन होत असतानाच सांगलीच्या बाजारपेठा सोमवारी गर्दीने फुलल्या होत्या. गणेशमूर्ती, पूजा व आरास साहित्य खरेदीसाठी दिवसभर भाविकांची लगबग सुरू होती.