शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सांगली : भुयारी विद्युत वाहिनीसाठी रस्ते खुदाईचा प्रस्ताव, महापालिका स्थायी सभेत टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 12:57 IST

सांगली महापालिका क्षेत्रातील रस्ते तीन-साडेतीन वर्षांनी खड्डेमुक्त होत आहेत. त्यात नवीन झालेले रस्ते भुयारी विद्युत वाहिनीसाठी खोदण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांची चाळण करून आमच्या पराभवाची सुपारी घेतली आहे का? असा सवाल गुरुवारी स्थायी समिती सभेत करण्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चांगले रस्ते खुदाईस सभेत विरोध केला.

ठळक मुद्देरस्त्यांची पुन्हा चाळण करून पराभवाची सुपारी घेतली का ?भुयारी विद्युत वाहिनीसाठी रस्ते खुदाईचा प्रस्तावसांगली महापालिका स्थायी सभेत टीकास्त्र

सांगली : महापालिका क्षेत्रातील रस्ते तीन-साडेतीन वर्षांनी खड्डेमुक्त होत आहेत. त्यात नवीन झालेले रस्ते भुयारी विद्युत वाहिनीसाठी खोदण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांची चाळण करून आमच्या पराभवाची सुपारी घेतली आहे का? असा सवाल गुरुवारी स्थायी समिती सभेत करण्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चांगले रस्ते खुदाईस सभेत विरोध केला.सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. सभेत सांगलीतील १९ किलोमीटर रस्त्यावर भुयारी विद्युत वाहिनी टाकण्याचा प्रस्ताव चर्चेला आला होता. यावर काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. यावेळी पाटील म्हणाले, साडेतीन वर्षानंतर शहरातील रस्ते खड्डेमुक्त होत आहेत.महापालिकेने २४ कोटींच्या निधीतून रस्त्यांचे डांबरीकरण हाती घेतले आहे. अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, असे असताना शहरात वीज कंपनीमार्फत भुयारी विद्युतकामास मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी खोदकामाचा आणि रस्ते दुरुस्तीचा २ कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे.या विद्युतकामाचे विषयपत्र सप्टेंबर महिन्यात वीज कंपनीने दिले होते. तेव्हा प्रशासनाने झोपा काढल्या का? सप्टेंबरमध्येच प्रस्ताव दिला असता, तर आतापर्यंत भुयारी विद्युतवाहिनीचे काम पूर्ण झाले असते. प्रशासनाने जाणीवपूर्वक हा प्रस्ताव अडवून आज रस्त्याचे काम झाल्यावर समोर आणला आहे.

रस्ते पुन्हा खोदून यामागे महापालिका निवडणुकीत आम्हाला पराभव करायची सुपारी घेतली आहे का? खोदकाम केल्यानंतर जवळच्या पाणी, ड्रेनेजच्या पाईप खोदल्यास जबाबदार कोण? शिवाय तब्बल १९ किलोमीटर खोदकामासाठी २ कोटी ८० लाखांची रक्कम तुटपुंजी आहे. हे रस्ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी किमान साडेचार-पाच कोटी रुपये लागतील. यामागे कोणाचे हित साध्य करायचे आहे? अशा प्रश्नाचा भडीमार केला.शिवराज बोळाज यांनी मात्र उलटा पवित्रा घेतला. ते म्हणाले, जेथे रस्त्याची कामे झाली नाहीत, तेथे खोदकाम करायला परवानगी द्या. गावभागात रस्तेकामे झाली नसल्याने तेथे भुयारी विद्युतीकरणाची कामे होऊ द्या. अखेर सर्वानुमते जेथे रस्ते कामे झाली नाहीत, तेथेच खोदकामास परवानगीचा निर्णय झाला. त्यासाठी वीज कंपनी आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून मंजूर निधीतून रस्ते पूर्ववत करण्याची लेखी हमी घ्यावी, असे आदेश सातपुते यांनी दिले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली