शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :ज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांकडूनच अन्याय : शरद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 17:09 IST

भिलवडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश निवृत्ती पाटील यांना पोटगी देण्याचे व न दिल्यास कारवाई करण्याचे लेखी शासकीय आदेश होऊनही पोलीस टाळाटाळ करीत आहेत. याविरोधात येत्या २० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांकडूनच अन्याय : शरद पाटील२० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सांगली : भिलवडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश निवृत्ती पाटील यांना पोटगी देण्याचे व न दिल्यास कारवाई करण्याचे लेखी शासकीय आदेश होऊनही पोलीस टाळाटाळ करीत आहेत. याविरोधात येत्या २० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले की, प्रकाश पाटील यांना कडेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी एप्रिल २०१७ मध्येच पोटगी मंजूर केली होती.जिल्हाधिकाऱ्यांनीही तसे आदेश दिले, मात्र तरीही पोटगी मिळत नाही. २००७ मध्ये आपल्या देशात ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी पारित केला आहे. यासाठीची नियमावली महाराष्ट्र शासनाकडूनही २०१० मध्ये तयार केली आहे. या नियमावलीनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची आहे. मात्र दुर्दैवाने ती सांगली जिल्ह्यात राबविली जात नाही.यासाठीचे अनेक पत्रव्यवहार आम्ही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केला; मात्र त्याला कोणताही प्रतिसाद यांच्याकडून दिला जात नाही. प्रकाश निवृत्ती पाटील यांना ७ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश होते. तरीही त्यांच्या मुलांनी ती देण्यास टाळाटाळ केली. याबाबत भिलवडी येथील सहायक पोलीस निरीक्षकांकडे तक्रार केल्यानंतरही त्यांनी त्याची दखल घेतली नाही.कारवाईबाबत त्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांचे लेखी आदेश असतानाही त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कडेगाव यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या तिन्ही मुलांना जोपर्यंत अटक होत नाही व कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकारी यांच्यावर शनिवार, दि. १८ आॅगस्टपर्यंत कडक कारवाई न झाल्यास जनता दलाचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असल्याचे यावेळी प्रा. पाटील यांनी सांगितले. यावेळी जनता दलाचे जिल्हाअध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे, सरचिटणीस जनार्धन गोंधळी, शशिकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली