शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सांगली : स्वच्छ भारतासाठी स्वच्छता हीच सेवा मोहिमेत सहभागी व्हा : दीपक म्हैसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 17:40 IST

महात्मा गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी व स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

ठळक मुद्देस्वच्छ भारतासाठी स्वच्छता हीच सेवा मोहिमेत सहभागी व्हा : दीपक म्हैसेकरकामेरी येथे स्वच्छता हीच सेवा मोहिमेच्या लोगो अनावरण

सांगली : महात्मा गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी व स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थी नजमा मुल्ला यांना धनादेश वितरण करण्यात आले. वाळवा तालुक्यातील कामेरी येथे स्वच्छता हीच सेवा मोहिमेच्या लोगो अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सरपंचा स्वप्नाली पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, वाळवा - शिराळा उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) दीपाली पाटील, सिनेअभिनेते विलास रकटे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, पंचायत समिती सदस्या सविता पाटील आदि उपस्थित होते.

रोजगार हमी योजनेतून शौचालय मंजूर झालेले लाभार्थी उमेश कोळी यांच्या निवासस्थानी शौचालय पायाभरणी आणि पंडित सदाशिव कोळी या लाभार्थीच्या निवासस्थानी शोषखड्डे पायाभरणी करण्यात आली.

स्वच्छतेची सवय प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे, असे स्पष्ट करून डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कामेरी गाव 2016 साली हागणदारीमुक्त झाले आहे, ही चांगली बाब आहे. स्वच्छतेसाठी सर्वांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यापुढेही स्वच्छ भारत आणि स्वच्छ कामेरी कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता हीच सेवा या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

स्वागत व प्रास्ताविक करताना रणजीत पाटील यांनी कामेरी गावाची वैशिष्ट्ये व गावातील स्वच्छता मोहीम, गावाला मिळालेले विविध पुरस्कार, नाविन्यपूर्ण उपक्रम यांची माहिती दिली. तसेच गावाची गोबरधन योजनेमध्ये निवड झाल्याची माहिती देऊन, आगामी नियोजन सांगितले. ग्रामपंचायत सदस्य पोपट कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी स्वच्छता हीच सेवा या मोहिमेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. दीपाली पाटील यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. तसेच, प्लास्टिक पिशव्यांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती म्हणून महिलांना कापडी पिशवी वाटप करण्यात आले. तसेच, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थी नजमा मुल्ला यांना धनादेश वितरण करण्यात आले.

यावेळी उपसरपंच तानाजी माने, नायब तहसीलदार सरस्वती पाटील, ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार, पाणीपुरवठा व स्वच्छचा विभागाचे सचिन सावंत, गणेश म्हस्के आणि सुहास गवळी, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालय, अभिलेख कक्ष, इ सेवा केंद्र आदिंची पाहणी केली. रोजगार हमी योजनेतून शौचालय मंजूर झालेले लाभार्थी उमेश कोळी यांच्या निवासस्थानी शौचालय पायाभरणी आणि पंडित सदाशिव कोळी या लाभार्थीच्या निवासस्थानी शोषखड्डे पायाभरणी करण्यात आली.

 

 

सामाजिक ऐक्य, शांतता अबाधित ठेवा, गणेशोत्सव, मोहरमचा आनंद द्विगुणित करावि. ना. काळमजिल्हाधिकारी, सांगली

आपण व्हॉटस् ॲप ग्रुपचे ॲडमिन आहात… तर अधिक सजग आणि जागृत रहा आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करू नका, असा मजकूर आल्यास पोलिसांना कळवा, ही आपली जबाबदारी आहे.सुहेल शर्माजिल्हा पोलीस अधीक्षक, सांगली

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्त