शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पंचायतनच्या उत्सवाची द्विशतकी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:48 IST

अविनाश कोळीसांगली: सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पावणेदोनशे वर्षांची आहे. १८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून किंवा त्यापूर्वीपासून उत्सवाची परंपरा याठिकाणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासूनचा विचार केला, तर तब्बल १७४ वर्षे उत्सवाला पूर्ण होतात. म्हणजे द्विशतकाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. १८५२ पासूनची या उत्सवाची कागदपत्रे उपलब्ध आहेत. सांगली ...

अविनाश कोळीसांगली: सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पावणेदोनशे वर्षांची आहे. १८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून किंवा त्यापूर्वीपासून उत्सवाची परंपरा याठिकाणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासूनचा विचार केला, तर तब्बल १७४ वर्षे उत्सवाला पूर्ण होतात. म्हणजे द्विशतकाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. १८५२ पासूनची या उत्सवाची कागदपत्रे उपलब्ध आहेत. सांगली पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाचा थाट पाहण्यासाठी सांगली, मिरज शहरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भाविकसुद्धा येत असतात. दरवर्षी पाच दिवसांचा हा उत्सव असतो.गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वीच येथील मंदिरात 'चोर' गणपती बसतात. गणपती मंदिर व दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रमांनंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. उंट, घोडे, भालदार, चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, खोबरे-पेढ्यांचा वर्षाव होतो. 'पुढल्यावर्षी लवकर या...' च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो. पूर्वी या उत्सवाचे नेतृत्व संस्थानच्या हत्तीकडे होते. संस्थानच्या शेवटच्या बबलू हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर हत्ती सांभाळणे बंद झाले. त्यामुळे उत्सवातील हत्तीची जागा रथाने घेतली. संस्थानचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी ही रथोत्सवाची परंपरा सुरू केली. तरीही हा सोहळा आजही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो. सांगलीच्या राजवाड्यापासून पश्चिमेकडील सर्व रस्ते विसर्जनादिवशी गर्दीने भरून जातात. पंचायतनमार्फत दरबार हॉलमध्ये आठ-दहा दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्यक्रमांची ही परंपराही अधिक समृद्ध करण्याचे काम विजयसिंहराजे पटवर्धन यांनीच केले आहे.