शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Sangli: वृद्ध महिलेला मिळाले पाच वर्षानंतर घरकुल, आयर्विन पुलाच्या बांधकामात दिलं होतं योगदान

By शीतल पाटील | Updated: August 19, 2023 00:16 IST

Sangli: कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाच्या बांधकामावेळी मजूर म्हणून काम करणाऱ्या वृद्ध महिलेला महापालिकेने घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर पाच वर्षानंतर वृद्धेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली.

- शीतल पाटील 

सांगली - कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाच्या बांधकामावेळी मजूर म्हणून काम करणाऱ्या वृद्ध महिलेला महापालिकेने घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर पाच वर्षानंतर वृद्धेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली. तिला महापालिकेच्यावतीने संजयनगर घरकुल योजनेतील सदनिका देण्यात आली.

सहा गल्ल्यांची नगरी म्हणून सांगलीची ओळख. कृष्णा नदीकाठी वसलेल्या सांगलीला १९१४ व १९१६ मध्ये प्रलयकारी महापुराचा सामना करावा लागला होता. त्यावेळी महापुरानंतर कृष्णा नदीवर पुल असावा, अशी चर्चा सुरु झाली. तत्कालीन सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांनी पुलासाठी पुढाकार घेतला. १९२७ मध्ये कृष्णा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले आणि १९२९ मध्ये ते पूर्ण झाले. या पुलाचे उद्घाटन तत्कालीन व्हाॅईसराय लार्ड आयर्विन यांच्याहस्ते झाल्याने त्यांचेच नाव पुलाला देण्यात आले. गेली ९३ वर्षे हा पुल अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार बनला आहे.

या पुलाच्या बांधकामावेळी सांगलीतील लक्ष्मी पुजारी यांनी मजूर म्हणून काम केले होते. त्यांनी पुलासाठी दगड डोक्यावरून आणले होते. सध्या पुजारी ११० वर्षाच्या आहेत. पाच वर्षापूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आली. तेव्हा आयर्विन पुलाच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी पुजारी यांना घरकुल देण्याची घोषणा तत्कालीन महापौर संगीता खोत यांनी केली होती. पुजारी यांची परिस्थिती गरीबीची आहे. त्यांना घर नाही. सध्या त्या नातीकडे राहतात. महापौर खोत यांनी घरकुलाबाबत महासभेत ठरावही केला होता. पण प्रशासकीय मंजुरीत तब्बल पाच वर्षे निघून गेली. नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आता नगरसेवकांचा कार्यकाल संपताना पुजारी यांना संजयनगरमधील पत्राचाळ घरकुल योजनेतील एक सदनिका देण्यात आली.यावेळी स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, नगरसेवक राजेंद्र कुंभार, पांडूरंग कोरे, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर, महिला बालकल्याण सभापती अस्मिता सरगर उपस्थित होत्या.

टॅग्स :Sangliसांगली