शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला सांगली, मिरजेची ॲलर्जी; संपर्क क्रांती थांबाही नाकारला

By अविनाश कोळी | Published: March 09, 2024 4:28 PM

प्रवासी संघटनांकडून संताप

सांगली : देशभरात एकूण ८२ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रॅकवरून धावत असताना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचीच या गाडीला ॲलर्जी असल्याचे चित्र आहे. कर्नाटक राज्यातील महत्त्वाच्या मार्गांवरूनही ही रेल्वे धावत आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून दुपदरीकरणाच्या कामाचे तांत्रिक कारण पुढे केले जात असले तरी कोकण मार्गावर असेच काम सुरू असतानाही वंदे भारत सुरू झाल्याने हे कारण तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे.कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत सुरु होणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी रेल्वेने केली होती, मात्र तीही फसवी निघाली. सांगलीतील सामाजिक संघटना, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सुरू असलेल्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये कोल्हापूर पाठोपाठ सांगली रेल्वेस्थानकावरून सर्वाधिक तिकिटांचे बुकिंग होत असते. कराड व किर्लोस्करवाडी रेल्वेस्थानक दुसऱ्या क्रमांकावरचे उत्पन्न देत आहे. पाच हजार कोटी खर्च करून पुणे-सांगली-लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले. जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सांगलीसारख्या प्रमुख महानगराला जलद रेल्वे गाड्यांचा संपर्क मिळावा.सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पुणे-लोंढा दुपदरीकरण रेल्वे प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. तरीही सांगली जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांच्या पदरात अद्याप वंदे भारतचे सुख पडलेले नाही. कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून या भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा आनंद रेल्वेने लगेचच हिरावून घेतला आहे.

टॅग्स :SangliसांगलीVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसmiraj-acमिरज