शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : आष्ट्यात तरुणाचा खून हल्लेखोर पसार, जागेच्या वादातून घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:58 IST

आष्टा (ता. वाळवा) येथील सचिन धनाजी हजारे (वय २५) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला.

ठळक मुद्देपथके रवाना, रात्री उशिरापर्यंत माने यास अटक करण्यात आलेली नव्हती

आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील सचिन धनाजी हजारे (वय २५) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. आष्टा-वडगाव रस्त्यावर मायाक्का मंदिरजवळ गुरुवारी सायंकाळी रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत.       

आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन हजारे हा शेती व मेंढीपालन करीत होता. त्यास धनगरी ओव्याचा छंद होता. आष्ट्यातीलच  शिवाजी माने याच्याशी सचिनचा जागेवरून वाद होता. गुरुवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान वैभव हॉटेलचे चालक व सचिन याचा मामे भाऊ अशोक रामचंद्र सिद्ध (वय ५० ) यांना सचिनचा हॉटेल मागे  ओरडल्याचा आवाज आला असता ते धावत घटनास्थळी आले. तिथे सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.  त्याला तुला कोणी मारले असे विचारले असता शिवाजी नायकू माने याने मारल्याचे सांगितले. 

सचिन याच्या कमरेवर वार झाले होते. याचवेळी शिवाजी माने हा बिरोबा मंदिराकडे पळत गेला व सायकल घेवून नागाव रस्त्याने निघून गेला. दरम्यान, सिद्ध यांनी इतर नातेवाईकांना बोलावून घेवून आष्टा पोलीस ठाण्यात माहिती दिली. सचिनला उपचारासाठी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेले.  मात्र उपचार सुरु करण्यापूर्वीच सचिन मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

सचिन याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरा सचिन याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक  सिद्ध यांनी शिवाजी माने याने सचिनचा खून केल्याची फिर्याद दिली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत माने यास अटक करण्यात आलेली नव्हती. त्याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :MurderखूनPolice Stationपोलीस ठाणेSangliसांगली