शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

सांगली महापालिका :भर पावसात अर्ज भरण्यास उत्साह, महापौर शिकलगार यांना उमेदवारी, नाईक यांचा पत्ता कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 16:27 IST

सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज, बुधवारपासून प्रारंभ झाला. भर पावसातही इच्छूकांनी मोठा उत्साह दाखविला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहाही कार्यालयात प्रचंड गर्दी झाली असून काँग्रेसकडून ४१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून २९ जागांची आघाडी झाली आहे.

ठळक मुद्देसांगली महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास भर पावसात इच्छूकांचा उत्साहमहापौर हारुण शिकलगार यांना उमेदवारी, राजेश नाईक यांचा पत्ता कापल्याची चर्चा

सांगली : सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज, बुधवारपासून प्रारंभ झाला. भर पावसातही इच्छूकांनी मोठा उत्साह दाखविला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहाही कार्यालयात प्रचंड गर्दी झाली असून काँग्रेसकडून ३८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून २९ जागांची आघाडी झाली आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपच्या अनेक इच्छूकांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांना तिकिट न मिळाल्याने नाराजी नाट्य रंगले आहे. विविध पक्षातील निष्ठावंताना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म निवडणुक कार्यालयात दाखल करण्यात आले आहे.काँग्रेसकडून ३८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून २९ जागांची आघाडी झाली आहे. मिरजेतील प्रभाग क्रमांक ५ आणि सांगलीतील प्रभाग क्रमांक १३ सांगलीवाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  ७ जागेवर मैत्रीपुर्ण लढत होणार आहे.  ४ जागा अनिल कुलकर्णीसाठी सोडल्या आहेत. महापौर हारुण शिकलगार यांना उमेदवारी देण्यात आली असून राजेश नाईक यांचा पत्ता कापल्याची चर्चा सुरु आहे. सावंत गट भाजपमध्ये दाखल झाल्याने सर्वच पक्षांतील इच्छूकांमध्ये नाराजी असल्याचे उघड झाले आहे. नायकवडी - जामदार तसेच हरिदास पाटील- दिलीप पाटील यांनी विरोधात अर्ज दाखल केल्याने त्यांची आमनेसामने लढत होईल अशी अपेक्षा आहे.कॉंग्रेस आणि भाजपची एकाच हॉटेलवर खलबते. सुरु असून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, जयश्री पाटील, आणि विशाल पाटील चौथ्या मजल्यावर तर भाजपचे खा. संजयकाका पाटील, दिनकर पाटील पाचव्या मजल्यावर उमेदवार व नाराजांशी चर्चा करीत आहेत.|महापालिकेच्यावतीने आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी तीन शहरांत सहा कार्यालये सज्ज ठेवली आहेत, तर पक्षीय पातळीवर उमेदवारांचे अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे. ११ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.सांगली महापालिका निवडणुकीसाठी एकूण २० प्रभागातील ७८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. येत्या १ आॅगस्ट रोजी मतदान होणार असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज, बुधवारपासून सुरू झाली आहे. ११ जुलैस दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पहिल्यांदाच या निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज भरले जात आहेत.या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समिती-आप या चार प्रमुख पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. प्रमुख राजकीय पक्षांतील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रमही झाला आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शनाची संधी साधली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी आघाडी केली आहे, तर शिवसेना व भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. सुधार समिती व आप यांची युती पहिल्यांदाच नशीब अजमावत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांकडे जवळपास ११०० हून अधिक इच्छुक आहेत.महापालिका प्रशासनाने अर्ज स्वीकारण्यासाठी सहा विभागीय निवडणूक कार्यालये सुरू केली आहेत. प्रत्येक निवडणूक कार्यालयात एक निवडणूक निर्णय अधिकारी व त्याच्या अखत्यारीखाली एक सहायक अधिकारी व दहा ते बारा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सांगलीत प्रभाग समिती एक (मुख्यालय), प्रभाग समिती दोन (शाळा क्रमांक एकजवळ), आरसीएच कार्यालय (काळ्या खणीजवळ) अशी तीन कार्यालये स्थापन केली आहेत. कुपवाडला एकच कार्यालय असून ते प्रभाग समिती तीनमध्ये आहे, तर मिरजेला दोन कार्यालये आहेत. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीElectionनिवडणूक