शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

सांगली महापालिका वीज बिल घोटाळा प्रकरण: एसआयटी नियुक्तीबाबत लोकायुक्तांकडून गृहखात्यावर ताशेरे

By शीतल पाटील | Updated: October 12, 2023 16:18 IST

दिरंगाईच्या चौकशीचे आदेश

सांगली : महापालिकेच्या वीजबिलातील पाच कोटी ९२ लाख रुपयांच्या घोटाळ्याची लोकायुक्तांनी गंभीर दखल घेत एप्रिल महिन्यात तीन सदस्यीय एसआयटी नियुक्तीचे आदेश दिले होते. पण आजअखेर एसआयटी स्थापन होऊ शकली नाही. गुरुवारी सुनावणीवेळी लोकायुक्तांनी गृहखात्याच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. एसआयटी नियुक्तीच्या दिरंगाईबाबत चौकशीचे आदेशही पोलिस महासंचालकांना देण्यात आले.दीड वर्षांपूर्वी महापालिकेच्या वीजबिलातील घोटाळा उघडकीस आला होता. पाच वर्षांतील या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. महापालिकेने महावितरण कंपनीला वीजबिलापोटी दिलेल्या धनादेशावर खासगी ग्राहकांची बिले भरण्यात आली. त्यानंतरही महापालिकेला थकबाकीची बिले आली. तत्कालीन आयुक्तांनी ११ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते. महापालिकेने महावितरणविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पण त्यानंतरही महापालिकेचे सहा कोटी वसूल झाले नव्हते. शिवाय दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईला टाळाटाळ सुरू होती.नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर, जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांच्यासह काहींनी वीजबिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर एप्रिल महिन्यात सुनावणी होऊन लोकायुक्तांनी तीन सदस्यांची एसआयटी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या समितीत महापालिका अधिकारी, शासकीय लेखापरीक्षक व पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. आठ आठवड्यांत चौकशी करून लोकायुक्तांकडे अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

पण ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी एसआयटी स्थापन झालेली नाही. गुरुवारी सुनावणीवेळी लोकायुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेत पोलिस महासंचालक व गृहखात्याच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. एसआयटी नियुक्तीस दिरंगाईची चौकशी करण्याचे आदेशही लोकायुक्तांनी दिले. तसेच आदेशाचे पालन पोलिस महासंचालक व गृहखाते करीत नसेल तर ही बाब गंभीर आहे. भ्रष्टाचाराबाबत चालढकलपणा जनतेच्या हिताच्या नाही, अशा शब्दात ताशेरेही ओढले.या सुनावणीला आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहूल रोकडे, नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

माळबंगला, शेतकरी बँकही रडारवरमाळबंगला येथील जागा खरेदीतील गैरकारभार व वसंतदादा बँकेत अडकलेल्या ठेवीवर साखळकर, रुईकर यांनी म्हणणे मांडले. या दोन्ही प्रकरणात महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची बाब त्यांनी लोकायुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :Sangliसांगलीelectricityवीज