शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Election सांगली महानगरपालिका निवडणूक : महापौर शिकलगार यांच्या उमेदवारी अर्जाला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:56 IST

सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी छाननी झाली. यात सायंकाळपर्यंत कोणाकोणाचे अर्ज रद्द होतात, याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे. महापौर हारुण शिकलगार यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून सायंकाळी त्यांच्या अर्जावर निर्णय होणार आहे.

ठळक मुद्देसांगली महानगरपालिका निवडणूकमहापौर शिकलगार यांच्या उमेदवारी अर्जाला आक्षप

सांगली : सांगलीमहानगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी छाननी झाली. यात सायंकाळपर्यंत कोणाकोणाचे अर्ज रद्द होतात, याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे. महापौर हारुण शिकलगार यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून सायंकाळी त्यांच्या अर्जावर निर्णय होणार आहे.अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी विक्रमी अर्ज अर्ज दाखल झाले. महापौर हारूण शिकलगार यांनीही आपला अर्ज बुधवारी दाखल केला. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्जाला गुरुवारी जोरदार आक्षेप घेण्यात आला.काँग्रेसने महापौर शिकलगार यांचा अर्ज तांत्रिक कारणाने बाद झाला, तर त्यांच्या चिरंंजीवाचा डमी अर्ज भरुन ठेवला आहे. शिकलगार यांच्याऐवजी त्यांच्या घरात उमेदवारी देण्यावरुन बराच खल झाला होता.महापौर हारुण शिकलगार यांना तीन अपत्ये असतानाही त्यांनी ही माहिती लपविल्याचा आरोप आसिफ बावा यांनी गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला आहे. यासंदर्भातील तक्रार त्यांनी आज दाखल केली. शिकलगार यांना तीन अपत्ये असतानाही त्यांनी ही माहिती लपवून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.

शासकीय निर्णयानुसार तीन अपत्ये असणारी व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र असतानाही त्यांनी अपत्याबद्दल माहिती लपवून अर्ज दाखल केला आहे. तो रद्दबातल ठरवावा, अशी मागणी आसिफ बावा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.दरम्यान, यासंदर्भात इतर उनेदवारांच्या अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतरच सुनावणी करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.दरम्यान, महापौरांच्या अर्जावरील सुनावणी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती ठोंबरे यांनी पत्रकारांना दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकले असून याबाबत सहा वाजता निकाल दिला जाईल, अशी माहिती ठोंबरे यांनी पत्रकारांना दिली.

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका