शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका उभारणार १०० खाटांचे रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:17 IST

खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधितांची होणारी लूट, रुग्णालयातील खाटाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी १०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसांगली महापालिका उभारणार १०० खाटांचे रुग्णालयनितीन कापडणीस यांचा निर्णय : जागेबाबत पदाधिकार्‍यांशी बैठक

सांगली : खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधितांची होणारी लूट, रुग्णालयातील खाटाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी १०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयासाठी प्रशासनाने जागेचा शोध सुरू केला आहे.जागेसंदर्भात रविवारी पदाधिकारी व नगरसेवकांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण आढळून येत आहेत. यातच खाजगी रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारापोटी लाख ते दीड लाख रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची त्याच्या नातेवाईकाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगरसेवक अभिजीत भोसले, नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी खासगी रुग्णालयाच्या लुटीविरोधात आवाज उठवला आहे. त्यातच महापालिका क्षेत्रातील रुग्णांसाठी खाटाही कमी पडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.नुकत्याच महापालिकेत झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी ५०० खाटांचे रुग्णालय उभारण्याची मागणी केली होती. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयुक्त नितीन कापडणीस यांनीही तातडीने 100 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या कोविड रुग्णालयात ॲाक्सिजन बेडची व्यवस्था असणार आहे. यासाठी महापालिका क्षेत्रात जागेचा शोध सुरू करण्यात आला. असून १०० खाटा आणि अन्य सामग्री बसणारी जागा किंवा मंगल कार्यालयाचा हॉल निवडला जाणार आहे.

याबाबत रविवारी पदाधिकारी, नगरसेवकांसोबत बैठक घेऊन या १०० खाटांच्या रुग्णालयाचे नियोजन केले जाणार आहे. महापालिकेकडून जागेची निश्चिती होता तात्काळ रुग्णालय उभारण्यास सुरूवात होईल, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.जिल्ह्यातील रुग्णांवरही मनपाकडून खर्च कोरोनाच्या महामारीत महापालिकेने केवळ शहरातील रुग्णांची नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचीही काळजी घेतली आहे.

महापालिकेने उभारलेल्या कोवीड केअर सेंटर, इंस्टिट्यूट क्वारंटाईन कक्षात शहरासह ग्रामीण भागातील रुग्णही दाखल झाले आहेत. या रुग्णांना जेवण, नाष्टा ते औषधापर्यंतचा खर्च महापालिकेने केला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना सर्व त्या सुविधा महापालिकेने पुरविल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाhospitalहॉस्पिटलcollectorजिल्हाधिकारी