शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेकडून दहा हजार जणांना जप्तीपूर्व नोटिसा-: २५० मिळकतधारकांना मालमत्ता जप्तीचे वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:40 IST

महापालिकेने थकीत घरपट्टीपोटी दहा हजार मालमत्ता धारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविल्या आहेत. तसेच शहरातील २५० मालमत्ताधारकांना जप्तीचे वॉरंट बजावले आहे.

ठळक मुद्देघरपट्टी थकीतप्रकरणी कारवाई सुमारे १ कोटी ६० लाख रूपयांची थकबाकी आहे

सांगली : महापालिकेने थकीत घरपट्टीपोटी दहा हजार मालमत्ता धारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविल्या आहेत. तसेच शहरातील २५० मालमत्ताधारकांना जप्तीचे वॉरंट बजावले आहे. त्यांच्याकडे सुमारे एक कोटी ६० लाखांची थकबाकी असून सात दिवसात ती न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा इशाराही नोटिसीद्वारे दिला आहे. महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या आदेशाने घरपट्टी थकीत व चालू मागणी वसूल करण्यासाठी घरपट्टी विभागाने मोहीम हाती घेतली आहे.

आयुक्तांनी घरपट्टी विभागाला ५० कोटी रूपये वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली. यातील दहा हजार रूपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम असलेल्या सुमारे १० हजार मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यांनी मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांना जप्तीचे वॉरंट बजावले जाणार आहे. जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी ९ जणांची वॉरंट आॅफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे म्हणाले, सांगलीतील २५०  मालमत्ता धारकांना आता जप्तीचे वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यांच्याकडे सुमारे १ कोटी ६० लाख रूपयांची थकबाकी आहे. या सर्वांना आता सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मालमत्ता जप्तीची कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. तेरा हजार घरांचा सर्व्हे पूर्णनितीन शिंदे म्हणाले, महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचा सर्व्हे सुरु आहे. यामध्ये घरपट्टी, पाणीपट्टीसह विविध प्रकारचे पालिकेचे परवाने संबंधित मालमत्ता धारकांकडे आहेत का? याची माहिती संकलित करण्यात येत आहे. शहरातील १३ हजार मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. हे काम डिसेंबरअखेरपर्यंत चालणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली