शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या दणक्याने दोन कोटीची घरपट्टी वसूल

By शीतल पाटील | Updated: February 27, 2023 19:59 IST

याबाबत न्यायालयात वादही सुरू होता.

सांगली : गणपती पेठेत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेकडे तीन कोटी रुपयांची घरपट्टी थकीत होती. याबाबत न्यायालयात वादही सुरू होता. अखेर न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सोमवारी घरपट्टी विभागाच्या पथकाने बँकेवर जप्तीची कारवाई हाती घेतली. अखेर बँकेकडून दोन कोटी ८ लाख रुपयांची थकबाकी भरून जप्तीची कारवाई टाळण्यात आली.महापालिकेकडून थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीची मोहिम हाती घेतली आहे. कर वसुलीत हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा इशाराही आयुक्त सुनील पवार यांनी दिला आहे. त्यामुळे सुट्टीदिवशीही घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान गणपती मंदिराजवळील स्टेट बँक ऑफ इंडियाकडे २०१८ पासून घरपट्टीची थकबाकी होती. ही थकबाकी ३ कोटी ७ लाख ५१ हजारापर्यंत पोहोचली होती. त्यात बँकेने जिल्हा न्यायालयात कराबाबत दावाही दाखल केला होता. या दाव्याचा निकाल ४ फेब्रुवारी रोजी लागला. न्यायालयाने बँकेची याचिका फेटाळून लावली होती.न्यायालयीन निकालानंतर महापालिकेने बँकेला थकबाकीपोटी जप्तीची नोटीसही बजाविली. तरीही बँकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे, वाॅरंट अधिकारी काका हलवाई यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथक बँकेत धडकले. थकबाकी न भरल्यास बँकेला सील ठोकण्याचा इशाराही दिला. तब्बल तासभर कारवाईबाबत वादविवाद सुरू होता. अखेर बँकेकडून थकबाकीची रक्कम भरण्याची तयारी दाखविण्यात आली.महापालिकेने दंडाच्या रकमेत सवलत देण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार बँकेला ९९ लाख २३ हजार ८८६ रुपयांची सवलत देण्यात आली. उर्वरित दोन कोटी ८ लाख २८ हजार ९५ रुपयाचा डीडी महापालिकेकडे सुपुर्द केला. त्यामुळे महापालिकेने जप्तीची कारवाई मागे घेतली.या कारवाईत कर अधिक्षक वाहिद मुल्ला, मोहिद्दीन पटेल, महेश भंडारे, शिवाजी शिंदे, गणी सय्यद, महेश साळुंखे, कुमार गेजगे, राजू जमादार, अनिकेत क्षीरसागर यांनी भाग घेतला.

तीन पाणी कनेक्शन तोडलीघरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीसह पाणी कनेक्शन तोडण्याची मोहिमही हाती घेतली आहे. सोमवारी थकबाकीपोटी तीन नळ कनेक्शन तोडण्यात आल्याचे कर निर्धारक नितीन शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली