शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : सटवाजीराजे डफळे यांचे स्मारक उजेडात, डफळापुरात समाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 13:08 IST

शिवकालीन सरदार आणि जत जहागीरीचे मूळ संस्थापक सटवाजीराजे डफळे यांची डफळापूर (ता. जत) येथील समाधी उजेडात आली आहे. या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे.

ठळक मुद्देसटवाजीराजे डफळे यांचे स्मारक उजेडात, डफळापुरात समाधीडफळे व गायकवाड कुटुंबियांकडून जीर्णोद्धाराचा संकल्प

जत : शिवकालीन सरदार आणि जत जहागीरीचे मूळ संस्थापक सटवाजीराजे डफळे यांची डफळापूर (ता. जत) येथील समाधी उजेडात आली आहे. उमराणी (ता. जत) येथील जहागीरदार अमरसिंहराजे डफळे यांच्या प्रयत्नातून व इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर (मिरज) यांच्या अभ्यासातून या शूर योध्याच्या स्मृतीस्थळाला उजाळा मिळाला आहे. या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे.शिवकाळातील प्रसिद्ध योध्दे सटवाजीराजे डफळे यांची समाधी डफळापूर येथील सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात असल्याची माहिती उमराणीचे जहागीरदार अमरसिंह डफळे यांना मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन माहिती घेतली.

मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनीही या समाधीस्थळाचा अभ्यास केला. बांधकाम शैली आणि भव्यता पाहून ही प्रसिद्ध व्यक्तीचीच समाधी असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. घराण्यातील अन्य व्यक्तींचा अभ्यास केला असता, ही समाधी सटवाजीराजे डफळे यांचीच असल्याची खात्री झाली आहे.डफळापूरच्या उत्तर बाजूस बेळुंखी रस्त्यालगत गावात प्रवेश करताना सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात ही समाधी आहे. गायकवाड घराणे हे डफळे घराण्याचे नजीकचे आप्त आहेत. त्यांनी आजवर या समाधीचे जतन करून ठेवले आहे. या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची संकल्पना डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी मांडली. त्यानुसार एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करुन समाधीच्या सभोवताली असणारी काटेरी झुडपे काढण्यात आली. त्यामुळे आता हा परिसर स्वच्छ दिसत आहे.

या कार्यक्रमासाठी अमरसिंह डफळे, सुभाषराव गायकवाड, रमेश गायकवाड, सुरेशराव डफळे, विक्रमसिंह डफळे, बाळासाहेब गायकवाड, धैर्यशीलराव डफळे, संग्रामसिंह डफळे, राहुल डफळे, खर्डेकर सरकार, अमरसिंह इंगोले, बाप्पासाहेब डफळे, जयवंतराव डफळे, मोहनराव गायकवाड, रमेश शिंदे, वसंतराव चव्हाण, परशुराम चव्हाण उपस्थित होते.पराक्रमी सटवाजीराजेसटवाजीराजे डफळे हे पराक्रमी योध्दे होते. अदिलशहाने त्यांना जत, करजगी आणि कर्नाटकातील होनवाड, बारडोल या चार गावांचे देशमुखी वतन दिले होते. त्या काळातील अनेक लढायात त्यांनी पराक्रम गाजवला होता. मोगल काळातही त्यांना नवीन वतने मिळाली होती. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिकSangliसांगली