शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिकारी घटनांच्या स्मारकासाठी सांगलीतून हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:24 IST

सांगली : क्रांतिकारी घटनांच्या स्मृती जपताना त्या नव्या पिढीसमोर प्रभावी माध्यमातून मांडण्यासाठी सांगली, हरिपूर परिसरात प्रेरणादायी स्मारक उभारले जावे, अशी मागणी मंगळवारी हरिपूर येथील ग्रामस्थ व काँग्रेस सेवा दलाच्यावतीने करण्यात आली. २४ जुलै १९४३ च्या क्रांतिकारकांच्या जेल फोडण्याच्या घटनेला मंगळवारी ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.ब्रिटिशांविरोधातील लढ्याच्या थरारक ...

सांगली : क्रांतिकारी घटनांच्या स्मृती जपताना त्या नव्या पिढीसमोर प्रभावी माध्यमातून मांडण्यासाठी सांगली, हरिपूर परिसरात प्रेरणादायी स्मारक उभारले जावे, अशी मागणी मंगळवारी हरिपूर येथील ग्रामस्थ व काँग्रेस सेवा दलाच्यावतीने करण्यात आली. २४ जुलै १९४३ च्या क्रांतिकारकांच्या जेल फोडण्याच्या घटनेला मंगळवारी ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.ब्रिटिशांविरोधातील लढ्याच्या थरारक घटनांच्या पाऊलखुणा जिल्'ाने जपल्या असल्यामुळे क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून जिल्'ाची ओळख सर्वत्र होत असते. वसंतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटताना २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडून पलायन केले होते. क्रांतिकारकांच्या इतिहासातील ही एक मोठी घटना होती. यंदा या घटनेचा अमृतमहोत्सव होत असताना, नव्या पिढीला हा इतिहास कळावा म्हणून एकही स्मारक याठिकाणी उभारले गेले नाही. यावर ‘लोकमत’मध्ये रविवारी २२ जुलै रोजी ‘जागर’ या सदरात प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्याची दखल घेत मंगळवारी हरिपूर व सांगली येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहतानाच, स्मारक उभारणीसाठी हाक देण्यात आली.जायंटस् ग्रुप आॅफ प्रेरणा सहेली व राजे प्रतिष्ठान हरिपूर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हरिपूरमधील हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे व बाबूराव जाधव यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच विकास हणबर, पोलीसपाटील उमाकांत बोंद्रे, अमित वाडकर, संतोष कुरणे, ओंकार शेरीकर, केतन मोडके, नीलेश शेरीकर, गणेश कांबळे, वैशाली माने, सुनीता शेरीकर, सुचेता हरळीकर, सुभद्रा गुरव, अनुसया महाजन उपस्थित होते.काँग्रेस सेवा दलातर्फेही कार्यक्रम घेण्यात आला. येथील कारागृहासमोरील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती स्तंभास वसंतदादांचे सहकारी स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुकुमार पत्रावळे यांच्यासह पत्रावळे कुटुंबीय तसेच सेवा दलाचे मुख्य संघटक अजित ढोले, प्रमोद लाड उपस्थित होते. त्यानंतर सेवा दलातर्फे आमराईजवळील हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.‘लोकमत’ने केला जागर‘लोकमत’मधील ‘जागर’ सदरात २४ जुलै १९४३ च्या घटनेला उजाळा देतानाच स्मारक उभारणीच्या प्रलंबित मागणीवरही प्रकाशझोत टाकण्यात आला होता. मंगळवारी सामाजिक संघटना, सेवा दल यांच्यावतीनेही याबाबतची मागणी करून पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संघटना पदाधिकाºयांनी यावेळी ‘लोकमत’ने केलेल्या जागृतीबद्दल धन्यवादही दिले.स्वातंत्र्यसैनिकांचा स्फूर्तिदायी इतिहास नव्या पिढीला कळावा यासाठी सांगलीमध्ये स्मारक उभारणीबाबत ‘लोकमत’ने ‘जागर’मधून केलेली जागृती महत्त्वाची आहे. आमराई उद्यानाला हुतात्मा पत्रावळे यांचे नाव देण्याबरोबरच याच उद्यानात मागील बाजूस सचित्र इतिहास, त्यासंदर्भातील माहितीपर नकाशे, स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा, पुस्तके अशा माध्यमातून स्मारक करावे. हरिपूरलाही त्याचपद्धतीचे स्मारक झाले पाहिजे. आम्ही यासाठी पाठपुरावा करू.- अजित ढोले, मुख्य संघटक, सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल