शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : शरद पाटील यांना मोडी लिपीतील मानपत्र, राज्यातील पहिलाच उपक्रम मिरजेत, भाषा प्रसारासाठी उचलले अनोखे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:05 IST

मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाबद्दल मोडी लिपीतील मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एखाद्या मान्यवर व्यक्तीला मोडी लिपीतून मानपत्र देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने केला आहे.

ठळक मुद्देशरद पाटील यांना मोडी लिपीतील मानपत्रराज्यातील पहिलाच उपक्रम मिरजेतभाषा प्रसारासाठी उचलले अनोखे पाऊल

मिरज : मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाबद्दल मोडी लिपीतील मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एखाद्या मान्यवर व्यक्तीला मोडी लिपीतून मानपत्र देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने केला आहे.प्रा. शरद पाटील यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा.शरद पाटील यांचा हा अमृतमहोत्सव अभिनव पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागाने घेतला.

इतिहासविभाग प्रमुख डॉ. सुवर्णा पाटील यांनी मोडी लिपीतून मानपत्र देण्याची कल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी शरद पाटील यांच्या कायार्चा गौरव करणारे मानपत्र अतिशय सुंदर शब्दात तयार केले.

सदर मराठी मानपत्र मिरजेतील मोडीतज्ज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांच्याकडून मोडी लिपीत लिप्यंतरीत करून घेण्यात आले. त्यानंतर मिरजेतील इतिहासप्रेमी छायाचित्रकार रणधीर मोरे यांनी त्याचा कलात्मक मांडणी केली. या सर्वांच्या प्रयत्नातून मोडी लिपीतील एक सुंदर मानपत्र आकाराला आले.सदरचे मानपत्र अमृतराव सुर्यवंशी यांच्याहस्ते प्रा. शरद पाटील यांना प्रदान करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सी.टी. कारंडे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. गायकवाड, इतिहासविभाग प्रमुख डॉ.सुवर्णा पाटील, मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर उपस्थित होते.

मोडी लिपीतून एखाद्या मान्यवराला मानपत्र देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असावा, असे अमृतराव सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. या अभिनव उपक्रमाचे आयोजन मिरज महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने केले.

टॅग्स :Sangliसांगलीcultureसांस्कृतिकliteratureसाहित्य