शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

सांगलीतील मातोश्री पेट्रोलपंपात भेसळ झाल्याचे स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 12:43 IST

माधवनगर रस्त्यावरील बायपासजवळ असणाºया मातोश्री पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून मंगळवारी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस कंपनीकडे करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय काळम यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी विजय काळम यांनी घेतली गंभीर दखल पंपाचा परवाना रद्द करण्याची कंपनीकडे शिफारस पेट्रोल भरण्याच्या यंत्रामधील सील तोडल्याचे उघडकीस कारवाईमुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांत खळबळ

सांगली. 11 : माधवनगर रस्त्यावरील बायपासजवळ असणाºया मातोश्री पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून मंगळवारी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस कंपनीकडे करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय काळम यांनी दिली.

बायपास रस्त्यावर महेंद्र भालेराव (रा. जळगाव) यांचा मातोश्री पेट्रोलपंप आहे. महिन्याभरापूर्वी त्यांनी हा पंप चालविण्यासाठी घेतला आहे. या पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल जिल्हाधिकाºयांनी घेतली.

२६ सप्टेंबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हाधिकारी काळम-पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी पंपावर छापा टाकला होता. त्यानंतर जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, वैध मापन निरीक्षक आर. पी काळकुटे, भारत पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक जे. एस. जोसेफ असे प्रमुख अधिकारी कर्मचाºयांसह पंपावर दाखल झाले होते.सुमारे तीन तासांहून अधिक काळ पंपाची तपासणी सुरू होती. यावेळी पेट्रोल भरण्याच्या यंत्रामधील सील तोडले असल्याचे उघडकीस आले होते.

दरम्यान, पेट्रोलची घनता तपासली असता, तीही नियमापेक्षा अधिक असल्याचे समोर आले होते. ७४० ते ७४६ पर्यंत आवश्यक असणारी घनता ७६८ पर्यंत असल्याचे समोर आले होते. त्याचवेळी इंधनामध्ये भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच तेथील पेट्रोलचा रंग काळपट असल्याचे निदर्शनास आले होते. पंपावरील स्टॉक रजिस्टरदेखील अद्ययावत नव्हते. अन्य त्रुटी यावेळी आढळून आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे पंपावरील पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

त्याचा अहवाल मंगळवारी सायंकाळी प्रशासनास प्राप्त झाला. यामध्ये प्रशासनाने व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला. अनेक बाबींमध्ये दोष आढळत पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगलीतील या पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस संबंधीत कंपनीकडे बुधवारी करण्यात येणार असल्याचे विजय काळम यांनी सांगितले.

पंपचालकांमध्ये खळबळअचानक झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांत खळबळ उडाली होती. त्यानंतर कारवाई काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता तपासणीत भेसळ स्पष्ट झाल्यामुळे परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या पेट्रोलपंपांबद्दल तक्रार येईल, त्याठिकाणी तपासणी करण्याची व दोष आढळल्यास कारवाईची जिल्हा प्रशासनाची भूमिका असल्याने पंपचालकांत खळबळ माजली आहे.