शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सांगली बाजार समितीमध्ये बिराजदार अपात्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:51 IST

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपात्र संचालकपद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सुगलाबाई शिवगोंडा बिराजदार यांचे अपील पणन संचालकांनी फेटाळले.

ठळक मुद्देपणन संचालकांचा निर्णय : जिल्हा उपनिबंधकांची कारवाई कायमगैरहजर राहिल्याने संचालकपद रद्द करण्याची तक्रार

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपात्र संचालकपद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सुगलाबाई शिवगोंडा बिराजदार यांचे अपील पणन संचालकांनी फेटाळले. त्यांचे संचालकपद अपात्र ठरवण्याची जिल्हा उपनिबंधकांनी केलेली कारवाई कायम ठेवण्याचा निर्णय पणन सहसंचालक योगीराज सुर्वे यांनी दिला. या निर्णयातून सत्ताधारी संचालकांनी बाजी मारली असली तरी, बिराजदार यांना पणन मंत्र्यांकडे अपील करता येणार आहे.महाराष्ट्र कृषी खरेदी-विक्री अधिनियमातील तरतुदीनुसार बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सलग सहा सभांना काँग्रेसमधील दुसºया गटाचे नेते विशाल पाटील समर्थक सुगलाबाई बिराजदार गैरहजर राहिल्याने संचालकपद रद्द करण्याची तक्रार स्वीकृत संचालक दादासाहेब कोळेकर यांनी जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांच्याकडे केली होती. बाजार समिती सभापती निवड २३ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली होती. त्यावेळी संचालकांची पळवापळवी आणि राजकीय कुरघोड्या झाल्या होत्या. तेव्हा बिराजदार यांचे संचालक पद रद्द व्हावे, यासाठी त्यांना संचालक मंडळाच्या सभेला उपस्थित राहू दिले नव्हते. त्यांच्या गैरहजेरीबद्दल त्यांचे संचालक पद रद्द करण्यासाठी सत्ताधारी गटाकडून प्रयत्न झाले होते.जिल्हा उपनिबंधक अष्टेकर यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार बाजार समिती संचालक मंडळाच्या सलग तीन सभांना गैरहजर राहिल्याने बिराजदार यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या कारवाईविरोधात न्याय मागण्यासाठी बिराजदार यांनी पणन संचालकांकडे अपील केले होते. त्यावर सहसंचालक सुर्वे यांनी दिलेल्या निर्णयामध्ये दि. ५, २३ आणि ३० नोव्हेंबर २०१६ या तीन सलग सभांना गैरहजर राहिल्या असल्याचे म्हटले आहे. बिराजदार यांनी तीन सभांना गैरहजर राहण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. त्या सभेसाठी बाजार समितीत आल्या होत्या, परंतु त्यांचे अपहरण झाले, त्याबाबतची नोंद पोलिस ठाण्यात आहे. मात्र न्यायालयाने कोणताही मनाई आदेश दिलेला नाही. त्यामुळे युक्तिवादाचा विचार करता येणार नाही.बाजार समितीच्या सलग तीन सभांना गैरहजर राहिल्यास सभापती, उपसभापती आणि सदस्य यांचे सभासदत्व रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार अपात्र संचालिका बिराजदार यांचे अपील फेटाळण्यात येत आहे. जिल्हा उपनिबंधकांनी १७ जानेवारी रोजी संचालक अपात्रतेचा निर्णय कायम ठेवण्यात येत असल्याचे पणन सहसंचालकांच्या आदेशात म्हटले आहे.विरोधकांना मोठा धक्कासुगलाबाई बिराजदार यांचे संचालकपद अपात्र झाल्यामुळे बाजार समितीमध्ये विरोधी गटाची संख्या एकने कमी झाली आहे. यामुळे पदाधिकारी बदलामध्ये विरोधकांच्या भूमिका काय असणार, याकडे सत्ताधाºयांचे लक्ष लागून राहिले आहे.