शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : महापालिका क्षेत्र शंभर टक्के हागणदारीमुक्त करू  : रवींद्र खेबूडकर, आणखी शौचालये बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:00 IST

अजूनही ८०० वैयक्तिक शौचालये बांधली जाणार असून, सांगली महापालिका क्षेत्र शंभर टक्के शहर हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.

ठळक मुद्दे महापालिका क्षेत्र शंभर टक्के हागणदारीमुक्त करू  : रवींद्र खेबूडकरअजूनही ८०० वैयक्तिक शौचालये बांधणार

सांगली : केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त घोषित झाले आहे. जानेवारीमध्ये क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या पथकाने पुन्हा महापालिका क्षेत्राची पाहणी करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. अजूनही ८०० वैयक्तिक शौचालये बांधली जाणार असून, सांगली महापालिका क्षेत्र शंभर टक्के शहर हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.ते म्हणाले, हागणदारीमुक्त शहर अभियानासाठी महापालिकेने सर्व्हे करून ७९९५ घरांमध्ये व्यक्तिगत स्वच्छतागृहे नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार शासनाने महापालिकेला ३५०० स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. महापालिकेने उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ३७०० वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदानही नागरिकांना देण्यात आले.

अजून ८०० घरांमध्ये वैयक्तिक शौचालये नाहीत. त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ही शौचालये पूर्ण झाल्यानंतर महापालिका क्षेत्र शंभर टक्के हागणदारीमुक्त होईल व अभियानात ओडीएफ प्लसमध्ये सांगलीचा समावेश होईल. त्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे खेबूडकर म्हणाले.वैयक्तिक शौचालयांबाबत सध्या काही नागरिकांच्या अडचणी आहेत. झोपडपट्टी परिसरात जागेची अडचण आहे. त्यामुळे त्यांना व्यक्तिगत स्वच्छतागृहांचा लाभ देणे अडचणीचे ठरत आहे. त्यांच्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे वाढविण्याचे काम हाती घेणार असल्याचेही खेबूडकर म्हणाले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान