शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कुरळपच्या भगतसिंग मंडळाने मिरवणुकीतील उधळपट्टीला दिला फाटा, अपघातग्रस्त तरुणाला केली आर्थिक मदत 

By संतोष भिसे | Updated: September 26, 2023 18:36 IST

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील भगतसिंग गणेश मंडळाने गणेशोत्सवातील डामडौल आणि उधळपट्टीला फाटा देत पैशाचा विधायक विनियोग केला. ...

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील भगतसिंग गणेश मंडळाने गणेशोत्सवातील डामडौल आणि उधळपट्टीला फाटा देत पैशाचा विधायक विनियोग केला. अपघातात जखमी तरुणाला ५० हजारांची मदत देऊन त्याचे प्राण वाचविले. मंडळाने उत्सवामध्ये व्याख्यान, महाप्रसाद, जोरदार विसर्जन मिरवणूक व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची जोरदार तयारी केली होती. त्यासाठी आगाऊ पैसेही दिले होते. याचवेळी गावातील सचिन दिनकर फल्ले हा युवक अपघातात जखमी झाला. जत येथील नोकरीच्या ठिकाणाहून कुरळपला येत असताना दुचाकीच्या आडवी शेळी आली. त्यात घसरुन रस्त्यावर आपटल्याने सचिनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला सांगलीत खासगी रुग्णालयात दाखल केले असून, चार दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. ५० हजार रुपयांची रक्कम सचिनच्या उपचारांसाठी दिले. सध्या त्याच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत आहे. मंडळाच्या मदतीमुळे फल्ले कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. मंडळाने गणेशोत्सवाचा खरा उद्देश प्रत्यक्षात आणत अन्य मंडळांपुढे आदर्श ठेवला आहे.

टॅग्स :SangliसांगलीGanesh Mahotsavगणेशोत्सव