शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : गुरूवंदनामध्ये रंगला तालासुरांचा आविष्कार, ºिहदमह्णतर्फे आयोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:08 IST

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे बहारदार शास्त्रीय गायन, तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज आदींचे उत्साह वाढविणारे तालवाद्य कचेरीचे अभिनव वादन अशा सुरमयी वातावरणात गुरूवंदना हा कार्यक्रम झाला. सांगलीकर रसिकांनी कार्यक्रमास गर्दी करत कलाकारांच्या आविष्काराला दाद दिली.

ठळक मुद्दे गुरूवंदनामध्ये रंगला तालासुरांचा आविष्कार, ºिहदमह्णतर्फे आयोजन अशोक नाडगीर यांचे बहारदार शास्त्रीय गायन

सांगली : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे बहारदार शास्त्रीय गायन, तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज आदींचे उत्साह वाढविणारे तालवाद्य कचेरीचे अभिनव वादन अशा सुरमयी वातावरणात गुरूवंदना हा कार्यक्रम झाला. सांगलीकर रसिकांनी कार्यक्रमास गर्दी करत कलाकारांच्या आविष्काराला दाद दिली.द ºिहदम अ‍ॅकॅडमीच्यावतीने विश्वविख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखा खॉसाहेब आणि तबलाविभूषण उस्ताद हाजी बाळासाहेब मिरजकर यांच्या परंपरेतील शिष्यवर्गांनी एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाची सुरुवात गुरू प्रतिमा पूजन व दीपप्रज्ज्वलनाने झाली. प्रारंभी ºिहदमच्या ५० शिष्यांनी तबलावादन केले. त्यानंतर पंडित अशोक नाडगीर (हुबळी) यांचे गायन झाले. या शास्त्रीय गायनात शुध्द कल्याण या रागात ख्याल गायन करून त्यांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांनी शुध्द कल्याण याच रागात जोड चीज सादर करून श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांना तबलासाथ सागर सुतार यांनी, तर हार्मोनियमवर धनंजय गाडगीळ यांनी साथ दिली.या बहारदार शास्त्रीय गायनानंतर अ‍ॅकॅडमीच्या ज्येष्ठ शिष्यवर्गाने तालवाद्य कचेरी हा अभिनव कलाविष्कार सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. त्यात सागर सुतार, पोपट जावीर, निशाद कुंभारे, विजय सांडगे, नामदेव नरळे, दादा मुळे (तबला), धनंजय गुरव (ढोलक), धनाजी केंगार (ढोलकी), नंदकुमार खोत (पखवाज) यांनी वादन केले.दुसऱ्या पुष्पात सचिन पटवर्धन (इंदोर) यांनी स्पॅनिश गिटार या वाद्यावर आपली कला सादर केली. त्यांनी सुरुवातीस आलाप, जोड झाला व त्यानंतर विलंबित गत झपताल श्री या रागात पेश केली. श्री रागात द्रुत बंदीश सादर केली व गिटार वादनाचा समारोप केला. त्यांना पंडित मनमोहन कुंभारे यांनी तबला साथ दिली.कुंभारे यांच्या तबलावादनास दादपंडित मनमोहन कुंभारे यांच्या तबला सोलो वादनास रसिकांनी विशेष दाद दिली. ताल त्रितालात त्यांनी पेशकार, कायदे अनेक घराण्यातील बंदिशी रेले, चलन चक्रधार फर्माईशी आणि कमाली चक्रधार पेश केली. त्यांना हार्मोनियमवर लहरा साथ विजय सांडगे यांनी दिली.

टॅग्स :musicसंगीतSangliसांगली