शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : सहकारी बँका संपविण्याचा सरकारचा डाव : दिलीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 13:55 IST

देशातील ८0 टक्के आर्थिक घोटाळे हे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये झाले असताना सहकारी बँकांवर नियंत्रणासाठी व्यवस्थापन मंडळाचा घाट घातला आहे. वास्तविक सहकारी बँका संपविण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने व पर्यायाने सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी टीका सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

ठळक मुद्देसहकारी बँका संपविण्याचा सरकारचा डाव : दिलीप पाटीलघोटाळेबाज राष्ट्रीयकृत बँकांवर मंडळ नेमावे

सांगली : देशातील ८0 टक्के आर्थिक घोटाळे हे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये झाले असताना सहकारी बँकांवर नियंत्रणासाठी व्यवस्थापन मंडळाचा घाट घातला आहे. वास्तविक सहकारी बँका संपविण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने व पर्यायाने सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी टीका सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.पाटील म्हणाले की, सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेमार्फत व्यवस्थापन मंडळ नियुक्तीचा दिलेला प्रस्तावअत्यंत चुकीचा आणि सरकारी कुटनितीचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. राज्यातील सहकारी बँकांचे काम हे राष्ट्रीयकृत बँकांच्या कितीतरी पटीने चांगले आहे.

गेल्या काही वर्षांची आकडेवारी काढली तर ८0 टक्क्यांहून अधिक घोटाळे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये झाले. त्याठिकाणचे ठेवीदार धास्तावले आहेत. याऊलट सहकारी आणि विशेषत : जिल्हा बँकांच्या ठेवींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आमच्याकडील ठेवीदारांची चिंता करण्यापेक्षा राष्ट्रीयकृत बँकांमधील ठेवीदारांची चिंता रिझर्व्ह बँकेने करायला हवी होती.रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात नेमलेली समिती ही केवळ सहकारी बँकांसाठीच का नियुक्त केली, हासुद्धा संशयाचा विषय आहे. एवढे मोठे आर्थिक घोटाळे करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांबाबत धोरण ठरविण्यासाठी एखादी समिती का नियुक्त केली नाही? सहकारी बँकांना या ना त्या मार्गाने अडचणीत आणण्याचा उद्योग गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाला आहे.

यापूर्वी जिल्हा तसेच अन्य सहकारी बँकांच्या चौकशा रिझर्व्ह बँकेने केल्या. त्यात त्यांना एक रुपयाचाही घोटाळा आढळून आला नाही. आर्थिक घोटाळ््यांची तपासणी करणाऱ्या अनेक यंत्रणा येऊन चौकशी करून गेल्या.

दुसरीकडे घोटाळ््यामागे घोटाळे करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्याठिकाणी चौकशा करण्याची तसदी जाणीवपूर्वक घेतली गेली नाही. हा दुजाभाव आता जनतेलाही कळलेला आहे.

जिल्हा बँकांमधील कर्जवाटप व अन्य धोरणांवर नियंत्रण रहावे म्हणून यापूर्वीच जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती केली गेली आहे. तरीही पुन्हा आणखी एक व्यवस्थापन मंडळ नेमण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने देऊन सहकारी बँकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.जिल्हा बँकांमार्फत विरोध नोंदवूया प्रस्तावावर २४ जुलैपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासंदर्भात राज्यातील जिल्हा बँका, सहकारी बँकांमार्फत आम्ही विरोध दर्शविणार आहोत. त्यापूर्वी आम्ही बँकींग क्षेत्रातील लोक एकत्र येऊन निर्णय घेऊ, असेही दिलीप पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :bankबँकSangliसांगली