शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Sangli Election कुपवाडमध्ये धनपाल खोत यांचे पानीपत पिता-पुत्राचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 21:43 IST

सांगली शहरातील ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांना या महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच पराभवाचा धक्का बसला. ग्रामपंचायतीपासून नगरपालिका आणि आता महापालिकेपर्यंत ते निवडून येत होते.

कुपवाड :  सांगली शहरातील ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांना या महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच पराभवाचा धक्का बसला. ग्रामपंचायतीपासून नगरपालिका आणि आता महापालिकेपर्यंत ते निवडून येत होते. पण या पराभवामुळे त्यांच्या शहरातील गेल्या वीस वर्षांच्या एकहाती साम्राज्याला धक्का बसला आहे.

कुपवाड शहराने ग्रामपंचायतीपासून नगरपालिका आणि आता महापालिका अशी स्थित्यंतरे अनुभवली आहेत. शहरात ग्रामपंचायत असताना खोत हे प्रथम सरपंच, त्यानंतर नगरपरिषद असताना नगरसेवक आणि महापालिकेची सत्ता आल्यावर प्रथम स्थायी समितीचे सभापतीपद आणि नगरसेवक पदावर विराजमान झाले होते. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी शहराच्या निवडणुकीची सूत्रे हाती घेऊन विजय मिळविले होते. शहरात त्यांना कायम किंगमेकर म्हणून ओळखले जायचे.

ग्रामपंचायतीच्या कालावधित त्यांनी प्रथम काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली. नंतरच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, महाआघाडी आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती.

दरम्यानच्या पक्ष बदला-बदलीच्या कालावधित त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याबरोबरच भाजपला आव्हान देऊन त्यांनी भाजपचीही नाराजी ओढवून घेतली होती. तशातच त्यांचे शहरातील काही नेत्यांशी सख्य नव्हते. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला आहे. त्यात त्यांना स्वाभिमानी आघाडीचे विजय घाडगे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.मुलगाही पराभूतज्येष्ठ नेते धनपाल खोत यांना प्रभाग क्रमांक एकमधून पराभवाचा धक्का बसला. तसेच प्रभाग क्रमांक दोनमधून त्यांचे पुत्र महावीर खोत यांनाही पराभवाचा धक्का बसला. नगरसेवक गजानन मगदूम यांनी त्यांचा पराभव केला. त्यांना खोत यांच्या नाराजीचा फटका बसल्याची चर्चा आहे. या पराभवामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.नात्यागोत्याला जय-पराजयाची किनारवडिलांचा पराभव, तर मुलगा विजयी : दोन दाम्पत्यांचा विजयसांगली : यंदाच्या महापालिका निवडणुकीतही घराणेशाहीची परंपरा जपणाऱ्या व नात्यागोत्यांतील उमेदवारांची गर्दी होती. यातील काहींनी बाजी मारली, तर काहींना पराभवाचा धक्का बसला. मिरजेत पुत्र विजयी झाले, तर वडिलांना पराभव पत्करावा लागला. मोहिते व मेंढे दाम्पत्य पुन्हा निवडून आले.

मिरजेतील प्रभाग ५ मधून माजी महापौर इद्रिस नायकवडी व प्रभाग ६ मधून त्यांचे चिरंजीव अतहर नायकवडी निवडणूक लढवित होते. त्यात अतहर नायकवडी विजयी झाले, तर इद्रिस नायकवडी यांना करण जामदार या काँग्रेसच्या उमेदवाराने पराभवाची धूळ चारली. करण जामदार निवडून आले असले तरी, त्यांचे वडील व काँग्रेसचे गटनेते, माजी महापौर किशोर जामदार यांना मात्र प्रभाग ७ मधून पराभवाचा धक्का बसला. माजी नगरसेवक सुरेश आवटी यांचे दोन्ही चिरंजीव संदीप व निरंजन हे अनुक्रमे प्रभाग ३ व ४ मधून विजयी झाले.नगरसेविका शालन चव्हाण यांचे चिरंजीव मंगेश चव्हाण, नगरसेविका शकुंतला भोसले यांचे चिरंजीव अभिजित, माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांच्या पत्नी पद्मश्री पाटील यांनी विजय मिळविला, तर धनपाल खोत व त्यांचे चिरंजीव महावीर खोत या दोघा पिता-पुत्रांना पराभवाचा धक्का बसला. काँग्रेसचे नेते नानासाहेब महाडिक यांच्या कन्या रोहिणी पाटील याही विजयी झाल्या.दोन दाम्पत्य सभागृहातप्रभाग १ मधून शेडजी मोहिते व प्रभाग २ मधून त्यांच्या पत्नी सविता या रिंगणात होत्या. दोघांनीही बाजी मारली; तर प्रभाग ५ मधून काँग्रेसचे संजय मेंढे व त्यांच्या पत्नी बबीता मेंढे यांनी सलग दुसºयांदा विजय मिळविला.दीर-भावजय विजयीप्रभाग १८ मधून महेंद्र सावंत व स्नेहल सावंत या दीर-भावजय यांनी दुसºयांदा विजय मिळविला. गतवेळी या दीर-भावजयीने राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविली होती. यंदा ते भाजपच्या चिन्हावर रिंगणात होते.काका विजयी, पुतण्या पराभूतप्रभाग क्रमांक ९ मधून नगरसेवक मनगू सरगर व त्यांचे पुतणे भूपाल सरगर आमने-सामने होते. यात काका मनगू सरगर यांनी बाजी मारत पुतण्याचा पराभव केला.

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकPoliticsराजकारणElectionनिवडणूक