शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याला मिळणार १२० ई-शिवाई बसेस, धूरमुक्त होणार प्रवास 

By अशोक डोंबाळे | Updated: August 23, 2023 18:25 IST

गाड्यांना २५० ते ३०० किलोमीटर क्षमतेची बॅटरी असणार

सांगली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हायटेक होत असून, यंत्रणा अत्याधुनिक करण्यावर भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता सांगली विभागात नव्या-कोऱ्या इलेक्ट्रिकल (ई-शिवाई) बसेस प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. या बसेस शिवाई नावाने धावणार आहेत. १८० गाड्यांचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, किमान १२० बसेस मंजूर होतील, असा अधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.डिसेंबर अखेरपर्यंत इलेक्ट्रिकल बसेस सांगली विभागाला मिळतील. त्यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग पॉईंट करण्यात येत आहेत. सांगली, मिरज, इस्लामपूर बसस्थानकात दोन मुख्य चार्जिंग स्टेशन असेल. २५० ते ३०० किलोमीटर क्षमतेची बॅटरी या गाड्यांना असणार आहे. या गाड्या दोन प्रकारच्या आहेत. २५० किलोमीटर अंतरापर्यंत धावेल इतकी क्षमता असणारी बॅटरी एका गाडीला आहे. दुसऱ्या प्रकारच्या गाडीकडे तीनशे किलोमीटर अंतर धावेल इतकी क्षमता असणारी बॅटरी आहे. जिल्ह्यातील सांगली, मिरज, इस्लामपूर, जत, विटा, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी या आठ आगारांमध्ये इलेक्ट्रिकल गाड्यांसाठी चार्जिंग पॉईंट असणार आहे. बॅटरी उतरल्यानंतर चार्जिंग करण्यासाठी प्रत्येक आगारात अत्याधुनिक सोय केली जात आहे.

खासगी कंपनीच्याच बसेसजिल्ह्याला ई-शिवाई या नावाने १२० इलेक्टिकल बसेस मिळणार आहेत. या सर्व बसेस खासगी कंपनीकडून भाड्याने घेण्यात येणार आहेत. कंपनीला प्रति किलो मीटर ४८ रुपये भाडे असण्याची शक्यता आहे.

मुख्य कार्यालयाकडे सांगली विभागासाठी १८० इलेक्टिकल बसेसची मागणी केली आहे. त्यापैकी किमान १२० बसेस मिळण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर, जत, तासगावसह आठ आगारांना पहिल्या टप्प्यात इलेक्टिकल बसेस देण्यात येणार आहेत. त्यासाठी चार्जिंग स्टेशन करण्यात येणार आहेत. येत्या सहा महिन्यांत बसेस मिळणार आहेत. - सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ, सांगली.

टॅग्स :Sangliसांगली