शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याच्या शिवसेनेत पुन्हा धुसफूस, नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:08 IST

गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत असलेली धुसफूस महापालिका निवडुकीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. महापालिकेत एकही जागा न जिंकू शकलेल्या शिवसेनेमध्ये याबाबतचे खापर एकमेकांवर फोडण्याचे काम आता सुरू झाला आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्याच्या शिवसेनेत पुन्हा धुसफूसनिवडणुकीने कळ : अपयशाने नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित

सांगली : गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत असलेली धुसफूस महापालिका निवडुकीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. महापालिकेत एकही जागा न जिंकू शकलेल्या शिवसेनेमध्ये याबाबतचे खापर एकमेकांवर फोडण्याचे काम आता सुरू झाला आहे. काहींनी उघडपणे तर काहींनी छुप्या पद्धतीने तक्रारी सुरू केल्या आहेत.सांगली जिल्ह्यातील शिवसेनेत गटबाजी मोठी आहे. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न या गटबाजीपासून सुरू होतो. त्यामुळे अनेकदा राज्यातील दिग्गज नेत्यांनी याबाबत प्रयत्न करूनही गटबाजी थोपविण्यात त्यांना यश आले नाही. कधी जाहीर सभांमध्ये, पक्षीय बैठकांमध्ये तर कधी आंदोलनांमध्येही गटबाजीचे दर्शन घडले.

महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ही गटबाजी संपल्याचे चित्र भासविण्यात आले. वास्तविक पवार गटाने घेतलेल्या फारकतीमुळे निवडणुकीच्या प्रारंभालाच गटबाजीचा नारळ फुटला होता. त्यानंतरही प्रचारकार्यातही स्थानिक नेत्यांची ताकद फारशी लागली नाही. त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत भोपळा हाती लागला. एकही सदस्य निवडून न आल्याने मोठी नामुष्की त्यांच्या पदरात पडली.

अपयशाचे खापर आता कोणावर फोडायचे याचा विचार करून एकमेकांना दोष देण्यात धन्यता मानली जात आहे. काहींनी उघडपणे पदाधिकाऱ्यांबद्दल तक्रारी केल्या तर काहींनी छुप्या पद्धतीने पक्षीय नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे ही धुसफूस आता वाढली आहे.

वास्तविक दोन्ही जिल्हाप्रमुख हे ग्रामीण भागातून आलेले असल्यामुळे त्यांना शहराच्या रणनितीविषयी अंदाज आला नाही, असेही मत मांडले जात आहे. तरीही शहरी भागातील पदाधिकाऱ्यांनाही याबाबत फारसा जोर लावता आला नाही. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही ठिकाणच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना या अपयशाबद्दल पक्षाकडून जबाबदार धरले जाऊ शकते.जिल्हाप्रमुखांबद्दल तक्रारशिवसेनेचीच शाखा असणाऱ्या अवजड वाहतूक सेनेने याबद्दल जिल्हाप्रमुख संजय विभुते आणि महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेबद्दल तक्रार केली आहे. यासंदर्भात या संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र कोळी यांनी प्रसिद्धीपत्रक काढून विरोध नोंदविला आहे. पक्षाकडेही याबाबत तक्रार केली आहे. त्यांचे राजीनामे घेऊन अन्य लोकांना संधी देण्याची म

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSangliसांगली